State of Maharashtra Wathar Police Station vs Somnath Dattu Kadam
Party Details
- State of Maharashtra Wathar Police Station
- Somnath Dattu Kadam
Case Summary
State of Maharashtra Wathar Police Station filed Case No. 193 in the District Court on 25 Jul 2023 against Somnath Dattu Kadam. The case has undergone 10 hearings over 1 year and 2 months. The case is currently pending. 1 order has been issued in this matter.
Hearing History (10)
- 17OCT 2024DisposedView Order ↗
Judge: Civil Judge Jr.Dn. J.M.F.C. Koregaon
- 15OCT 2024Evidence Part HeardView Order ↗
Judge: Civil Judge Jr.Dn. J.M.F.C. Koregaon
- 11OCT 2024EvidenceView Order ↗
Judge: Civil Judge Jr.Dn. J.M.F.C. Koregaon
Orders (1)
- 17OCT 2024Order on ExhibitView Order ↗
Order No: 1
Judgement DetailsView full order PDF ↗
(न्यायनिर्णय) नियमित फौजदारी केस क्रमांक १९३/२०२३ MHST090011252023 दाखल दिनांक : २५-०७-२०२३ नोंदणी दिनांक : २५-०७-२०२३ निकाल दिनांक : १७-१०-२०२४ कालावधी : व. म. दि. ०१०२२३ CNR.
No.MHST090011252023 नियमित फौजदारी खटला क्रमांक - १९३/२०२३ निशाणणी क्रमांक - ( न्यायनिर्णय ) कोरेगांव येथील न्यादंडाधिकारी प्रथमवर्ग , न्यायालय क्रमांक १ , ता . कोरेगांव , जि . सातारा . ( पिठासणण अधिकारी - चंद्रशिला शिवाजी पाटील ) (१७/१०/२०२४) (नियमित फौजदारी खटला क्रमांक १९३/२०२३) (भारतीय दंड संहिता कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ५१०) अभियोगपक्ष महाराष्ट्र शासन तर्फे वाठार पोलीस स्टेशन, ता. काेरेगांव जि. सातारा. अभियोगपक्षातर्फे अभियोक्ता श्री. एस. आय. सावंत आरोपी सोमनाथ दत्तू कदम वय – ४१ वर्षे, धंदा - मजूरी रा. देऊर ता. कोरेगांव, जि. सातारा. आरोपीतर्फे विधीज्ञ श्री. आर. सी. शिंदे 1 (न्यायनिर्णय) नियमित फौजदारी केस क्रमांक १९३/२०२३ गुन्हा घडल्याचा दिनांक ०५/०५/२०२३ तक्रार दाखल दिनांक ०६/०५/२०२३ पुरावा सुरू झाल्याचा दिनांक १५/१०/२०२४ न्यायनिर्णयासाठी प्रकरणण राखून ठेवल्याचा दिनांक निरंक न्यायनिर्णय दिनांक १७/१०/२०२४ न्यायनिर्णयातील शिक्षेसंर्दभात आदेशाचा दिनांक निरंक आरोपीची माहिती आरोपी क्रमांक नाव अटकेचा दिनांक जामीनावर सोडल्याचा दिनांक गुन्हयाचे कलम अंतिम आदेश शिक्षा फौ. प्र. सं. कलम ४२८ अन्वये समायोजित करण्याबाबत कालावधी १. सोमनाथ दत्तू कदम - फौजदारी प्रक्रिया संहिता ४१(अ) प्रमाणणे नोटीस दिली. भारतीय दंड संहिता कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ५१० निर्दोष मुक्तता करण्यात आली. निरंक निरंक 2 (न्यायनिर्णय) नियमित फौजदारी केस क्रमांक १९३/२०२३ सरकारपक्षातर्फे देण्यात आलेले साक्षीदार / बचावपक्षातर्फे साक्षीदार / न्यायालयीन साक्षीदार अ . अभियोगपक्ष सा. क्र. साक्षीदाराचे नाव स्वरुप निशाणणी क्र. १. शितल सोमनाथ कदम फिर्यादी ११ क . न्यायालयामार्फत निशाणणी ( फक्त आवश्यक कागदोपत्री पुरावा ) अ. क्र. निशाणणी वर्णन निरंक न्यायनिर्णय ( घोषित दिनांक १७ / १० / २०२४ ) प्रस्तुत खटला आरोपी विरूध्द भारतीय दंड संहिता कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ५१० खालील अपराधाकरीता चालविण्यात आला. अभियोग पक्षाची थाेडक्यात हकीकत खालीलप्रमाणणे - २] तक्रारदार सौ शितल सोमनाथ कदम रा. ाथ कदम रा. देऊर ता कोरेगाव जि सातारा या ठिकाणणी त्यांचे पती सोमनाथ कदम, मुलगी सिया, मुलगा वेदांत असे एकत्र राहणणेस आहेत. गावी तक्रारदारला घर व जमीन आहे. तक्रारदारचे पती सोमनाथ दत्तु कदम हे आर्मी खात्यात नोकरीस होते सध्या ते सेवानिवृत्त झालेने घरीच असतात. दिनांक ०५/०५/२०२३ रोजी रात्रौ १०.३० वा. चे सुमारास तक्रारदार व तक्रारदारची मुले जेवणणखान करुन बसले होते. त्यावेळी तक्रारदारचे 3 (न्यायनिर्णय) नियमित फौजदारी केस क्रमांक १९३/२०२३ पती हे बाहेरूनच जेवन करुन आले होते व त्यांनी दारु पिलेली होती. तक्रारदार पती यांनी तक्रारदारला विचारले की, ''तु माझे पाकिटातील पैसे घेतलेस का ?’’ त्यावर तक्रारदारने तिच्या पतीला म्हणणाली की, ''सकाळी सिया हिला मँगी खायची होती म्हणणुन मी फक्त ३० रु पाकीटामधुन घेतले होते.’’ असे सांगितलेवर आरोपीने तक्रारदारला शिवीगाळ करणणेस सुरुवात केली व म्हणणाले की '' मला न विचारता माझ्या पाकीटामधुन पैसे का घेतलेस'’ असे म्हणणुन तक्रारदारला हाताने व लाथाबुक्कयांनी मारहाणण करणणेस सुरुवात केली व तक्रारदारच्या हाताला धरुन तक्रारदारला '' घरातुन निघुन जा'’ असे म्हणणुन घरातुन बाहेर काढले म्हणणुन तक्रारदारने तिला अजुन जास्त मारहाणण करतील या भितीने तक्रारदार रस्त्याने त्यांचे घराजवळ असलेल्या शेताकडे निघाल्या. त्यावेळी आरोपी तक्रारदारच्या पाठीमागे येवु लागले. तक्रारदार देऊर येथील रेल्वे रुळाजवळ गेल्या. त्याठिकाणणी आरोपीने तक्रारदारला शिवीगाळ करुन शेतातील ऊस काढुन घेवुन त्या ऊसाने मारहाणण करणणेस सुरुवात केली. आरोपी तक्रारदारला म्हणणाले की '' तु रेल्वे खाली जिव दे'’ असे म्हणणुन त्यांनी तक्रारदारला रेल्वे रुळावरील पडलेला दगड हातात घेवुन तक्रारदारच्या पायावर मारला. तक्रारदारला मारहाणण करीत असलेने मोठमोठ्याने आरडाओरडा करुन '' मला त्रास देवु नका'’ असे म्हणणत होत्या तरी देखील आरोपी मारहाणण करीत राहीले. त्यानंतर आरोपीने तक्रारदारला '' जिवे मारुन टाकुन रेल्वे खाली फेकुन देईल'’ अशी धमकी दिली. त्यानंतर त्याठिकाणणी त्यांचे गावातील पोलीस पाटील अजित पाटील हे आले व त्यांनी तक्रारदार व आरोपीची भांडणणे सोडवुन आरोपीला समजावुन सांगुन त्यांना घरी जा असे सांगितलेने तक्रारदार व आरोपी घरी निघुन आले. सदर झालेल्या मारहाणणीत तक्रारदारला तिच्या पायावर ,हातावर ,पाठीवर ,मांडीवर मुका मार लागला होता. ागला होता. तसेच झाले मारहाणणीबाबत तक्रारदारने तिची आई शैला काशिनाथ धुमाळ रा. सोनके ता कोरेगाव, मावशी- शोभा श्रीरंग पवार रा पवारवाडी वाल्हे ता पुरंदर जि पुणणे यांना फोनवरुन मारहाणणीबाबत सांगितले आहे. तक्रारदारची आई तक्रारदारला घेणणेसाठी तक्रारदारचे घरी आज रोजी आल्या व तक्रारदारने त्यांच्या बरोबर चर्चा करुन पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली.
4 (न्यायनिर्णय) नियमित फौजदारी केस क्रमांक १९३/२०२३ ३] सदर तक्रारीवरून आरोपींविरूध्द् गुन्हा क्रमांक ३१/२०२३ अन्वये गुन्हयाची नोंद करण्यात आली. सदर गुन्हयाचा तपास तपासी अधिकारी श्री. एम. एम. बोडके यांनी केला. तपासादरम्यान त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. साक्षीदारांचे टिपणण घेतले. गुन्हयाचा तपास पुर्ण करून आरोपींविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले. ४] आरोपींविरुध्द भारतीय दंड विधान कलम, १८६० चे कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ५१० अन्वये दोषारोप (नि.७) निश्चित केला. आरोपींनी गुन्हा मान्य व कबुल नसल्याचे सांगुन खटला चालविणण ेची मागणणी केली. ५] अभियोगपक्षाचे पुराव्यात आरोपींविरुध्द गुन्हादर्शक सामग्री न आल्याने फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम ३१३ नुसार त्यांचे निवेदन नोंदविण्यात आले नाही. तसा आदेश नि.१ वर पारीत करण्यात आला. ६] अभियोगपक्षातर्फे विधिज्ञ श्री. एस. आय. सावंत यांचा युक्तिवाद ऐकला. आरोपीतर्फे विधिज्ञ श्री. आर. सी. शिंदे यांचा युक्तिवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे माझे विवेचनास उत्पन्न होतात, त्याचा निष्कर्ष व कारणणमिमांसा मी खालीलप्रमाणणे नोंदवित आहे. अ.क्र. विचारार्थ मुद्दे निष्कर्ष १. अभियोगपक्षाने हे शाबीत केले आहे का की,दि. ०५/०५/२०२३ रोजी रात्री १०.३० वा. सुमारास मौजे देऊर ते बिचुकले जाणणारे कच्च्या राेडवर रेल्वे रुळाजवळ तसेच फिर्यादी व आरोपीचे राहते घरात ता. कोरेगांव गावचे हद्दीत आरोपीने दारू पिवून '’ फिर्यादी यांनी आरोपीच्या पाकीटातील पैसे न विचारता घेतलेच्या कारणणावरून फिर्यादीस लाथाबुक्यांनी मारहाणण केली. तसेच देऊर नाही.
5 (न्यायनिर्णय) नियमित फौजदारी केस क्रमांक १९३/२०२३ ते बिचुकले जाणणारे कच्च्या रोडनेजात असताना रेल्वे रुळाजवळ आरोपीने फिर्यादीच्या पाठीमागे जावून ऊसाने व दगडाने मारहाणण केली व जीवे मारुन टाकून रेल्वेखाली फेकून देईन अशी धमकी दिली ? २. दिली ? २. अभियोगपक्षाने हे शाबीत केले आहे का की, उपरोक्त दिवशी, वेळी व ठिकाणणी आरोपीने फिर्यादीस मारहाणण करुन इच्छापुर्वक दुखापत केली ? नाही. ३. अभियोगपक्षाने हे शाबीत केले आहे का की, उपरोक्त दिवशी, वेळी व ठिकाणणी तुम्ही फिर्यादीस शिवीगाळ करुन सार्वजनिक ठिकाणणी शांततेचा भंग करण्यास प्रवृत्त केले ? नाही. ४. अभियोगपक्षाने हे शाबीत केले आहे का की, उपरोक्त दिवशी, वेळी व ठिकाणणी तुम्ही फिर्यादीस दमदाटी करुन फाैजदारीपात्र धाकदडपशाचा अपराध केला ? नाही. ५. अभियोगपक्षाने हे शाबीत केले आहे का की, उपरोक्त दिवशी, वेळी व ठिकाणणी तुम्ही दारुच्या नशेच्या अंमलाखाली फिर्यादीस शिवीगाळ करुन गैरवर्तणणूक केली ? नाही. ६. आदेश काय ? आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात येते. कारणणमिमांसा मुद्दे क्र . १ ते ५ करीता - ७] उपरोक्त सर्व मुद्दे हे एकमेकांशी निगडीत असल्याने, त्यासाठी करावे लागणणारे 6 (न्यायनिर्णय) नियमित फौजदारी केस क्रमांक १९३/२०२३ विवेचनाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ते विश्लेषणणासाठी एकत्रित विचारात घेतले आहेत. अभियोगपक्षाने आरोपीविरुध्द गुन्हा सिध्द करण्यासाठी तक्रारदार शितल सोमनाथ कदम (साक्षीदार नं.१) यांना निशाणणी ११ वर तपासले आहे. साक्षीदार क्र. १ आरोपी त्यांचे पती आहेत. त्यांच्याबरोबर केवळ शाब्दि क वादावादी झाली होती याव्यतिरिक्त काहीही घडले नसल्याचे कथन केले आहे. तक्रारदार साक्षीदार यांनी अभियोगपक्षास उपयुक्त अशी साक्ष दिली नाही, म्हणणून सरकारी पक्षाने न्यायालयाची परवानगी घेवून साक्षीदारांना उत्तरसूचक प्रश्न विचारले असता, त्यामधून सरकारी पक्षाचे कथनाला मदत करणणारा असा कोणणताही पुरावा अभिलेखावर आलेला नाही. फिर्यादीने फिर्यादीमध्ये आरोपीने तिला मारहाणण तसेच शिवीगाळ केली असे सांगितले असले तरी देखील सदर आरोपी मारहाणण व शिवीगाळ केल्याबाबत अवाक्षरही काढल्याचे दिसून येत नाही. तसेच तसा मजकूर देखील पुराव्यामध्ये दिसून येत नाही. ८] तक्रारदार अभियोगपक्षाचे कथनांप्रमाणणे साक्ष देत नाहीत. तक्रारदार व आरोपी यांचेत तडजोड झाली असून, त्याबाबतची तडजोड पुरशीस त्यांच्या सहीनिशी नि. ०९ दाखल केली आहे. एकंदरीत पुराव्यावरुन असे दिसून येते की, तक्रारदार व आरोपी यांची तडजोड झाली असल्यामुळे तक्रारदार अभियोगपक्षाला समर्थन करत नाही. करत नाही. अशा परिस्थि तीमध्ये आरोपीने दारु पिवून तक्रारदारला ऊसाने, लाथाबुक्यांनी व हाताने मारहाणण करुन दुखापत केली व तक्रारदारचा अपमान करुन तिच्याकडून सार्वजनीक शांततेचा भंग व्हावा किंवा अन्य कोणणताही अपराध घडावा या उद्देशाने प्रक्षोभित करुन फौजदारीपात्र धाकदपटशा करुन त्याला जीवे मारण्याची धमकी दिली, या सर्व बाबी शाबीत करणणेकरीता कोणणताही सबळ, थेट किंवा सकृतदर्शनी पुरावा अभिलेखावर आलेला नाही. त्यामुळे आरोपीने भारतीय दंड विधान १८६० चे कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ५१० अन्वये अपराध केल्याचे संशयाचे पलीकडे सिध्द होत नाही. सबब, मुद्दे क्र.१ ते ५ चे उत्तर मी नकारार्थी नोंदवित आहे. ९] फिर्यादीच्या साक्षी पुराव्याचे अवलोकन करता त्यांनी परस्पर विरोधी कथन केल्याचे दिसुन येते त्यामुळे सदर साक्षीदाराने न्यायालयासमोर खोटा पुरावा दिल्याच्या विरूध्द खोटी साक्ष दिल्याच्या (परज्युरी) या अपराधासाठी त्याच्याविरूध्द कारवाई करणणे उचित ठरते परंतु अभिलेखावरून आणि तक्रारदारच्या साक्षी पुराव्यावरून असे दिसुन येते की, आरोपी व 7 (न्यायनिर्णय) नियमित फौजदारी केस क्रमांक १९३/२०२३ तक्रारदार तसेच जखमी साक्षीदार यांचेमध्ये तडजोड झाल्याने त्यांनी सदरील परस्पर विरोधी वक्तव्य केलेले आहे. त्यामुळे तशी कोणणतीही कार्यवाही करणणे संयुक्तिक होणणार नाही. मुद्दा क्र . ६ बाबत - १०] मुद्दे क्र.१ ते ५ चे नकारार्थी निष्कर्ष पाहता आरोपीस सदर गुन्हयातून निर्दोषमुक्त करणणे क्रमप्राप्त ठरते. प्रस्तूत प्रकरणणातील जप्त मुद्देमाल ऊस व दगड मूल्यहीन असल्याने अपील कालावधीनंतर अपीन न झालेस सदर मुद्देमाल मूल्यहीन असल्याने तो नष्ट करण्यात यावा. एकंदरीत वरील सर्व चर्चेवरून मुद्दा क्र. ६ च्या उत्तरादाखल मी खालीलप्रमाणणे आदेश पारीत करत आहेः आदेश १. आरोपी सोमनाथ दत्तू कदम यांना भारतीय दंड संहिता, १८६० चे कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ५१० अन्वये अपराधातून फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम २४८ (१) अन्वये निर्दोषमुक्त करण्यात येते. २. आरोपीचे वैयक्तिक बंधपत्र व जामीनपत्र रद्द करण्यात येते. ३. मा. अपिलीय न्यायालयात या निकालाविरुद्घ अपील दाखल झालेस उपस्थि त राहणणेसाठी आरोपीने फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम ४३७ (अ) प्रमाणणे प्रत्येकी र.रु.१५,०००/- चे वैयक्तिक बंधपत्र व जामीनपत्र द्यावे. ४. द्यावे. ४. प्रस्तूत प्रकरणणातील जप्त मुद्देमाल ऊस व दगड मूल्यहीन असल्याने अपील कालावधीनंतर अपीन न झालेस सदर मुद्देमाल मूल्यहीन असल्याने तो नष्ट करण्यात यावा. ५. संबंधित लिपीक यांना सदर प्रकरणणातील तडजोड पुरसीस निशाणणी क्र.
8 (न्यायनिर्णय) नियमित फौजदारी केस क्रमांक १९३/२०२३ ०९ ही निशाणणी क्र. १ सोबत जपून ठेवणणेबाबत निर्देष देण्यात येताे (खुल्या न्यायालयात घोषीत केला.) कोरेगांव. (चंद्रशिला शिवाजी पाटील) दि. १७/१०/२०२४ प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, कोरेगांव 9 (न्यायनिर्णय) नियमित फौजदारी केस क्रमांक १९३/२०२३ प्रमाणणपत्र असे प्रमाणित करण्यात येते की, वरील न्यायनिर्णय हा मूळ न्यायनिर्णयाप्रमाणणे बरोबर आहे. लघुलेखक - श्री. एन. डी. खुस्पे न्यायालय - प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, कोरेगांव न्यायनिर्णय संक्रमित दिनांक -१७/१०/२०२४ लघुलेखक 10