Dhairyshil Sambhajirao mane vs Chief Officer, Rahimatpur Nagar Parishad, Rahimatpur
Party Details
- Dhairyshil Sambhajirao mane
- Chief Officer
- Rahimatpur Nagar Parishad
- Rahimatpur
Case Summary
Dhairyshil Sambhajirao mane filed Case No. 182 in the District Court on 25 Jul 2023 against Chief Officer and Rahimatpur Nagar Parishad. The case has undergone 6 hearings over 2 months. The case is currently pending. 1 order has been issued in this matter.
Hearing History (6)
- 20OCT 2023DisposedView Order ↗
Judge: Jt. Civil Judge Jr.Dn. J.M.F.C. Koregaon
- 13OCT 2023Argument on Exh.____ReadyView Order ↗
Judge: Jt. Civil Judge Jr.Dn. J.M.F.C. Koregaon
- 6OCT 2023Argument on Exh.____ReadyView Order ↗
Judge: Jt. Civil Judge Jr.Dn. J.M.F.C. Koregaon
Orders (1)
- 20OCT 2023Order on ExhibitView Order ↗
Order No: 1
Judgement DetailsView full order PDF ↗
1 MHST090011102023 फौजदारी किरकोळ अर्ज क्र . १८२ / २०२३ मधील निशाणी क्र . १ वरील आदेश अर्जदार यांनी जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम कलम १३ (३) नुसार त्यांचे वडील कै. संभाजी बाबुराव माने यांच्या मृत्यूची नोंद होण्याबाबत प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कै. संभाजी बाबुराव माने यांचा मृत्यू दि. २३/०५/२०२१ रोजी झाला आहे. तथापि, कोराेना या रोगाची भयंकर साथ सुरु असल्यामुळे त्यावेळी त्यांच्या वडीलांच्या मृत्यूची नोंद नगरपरिषद रेकॉर्डसदरी करण्याची राहून गेली आहे. अर्जदार यांना जन्म मृत्यू विवाह निबंधक, मुख्याधिकारी रहीमतपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा यांनी वडीलांच्या मृत्यूची नोंद दप्तरी नसलेबाबत लेखी कळविले आहे. अर्जदार यांना वारस नोंदीकरीता त्यांचे वडील कै. संभाजी बाबुराव माने यांच्या मृत्यू दाखल्याची आवश्यकता आहे. त्यामुळे, त्यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. २. प्रस्तुतचा अर्ज दाखल झाल्यानंतर दि. ०६/०८/२०२३ रोजी नि.क्र. ९ ला असलेल्या दै. प्रभात या वृत्तपत्राद्वारे प्रस्तुत अर्जासोबत कोणाच्या हरकती असल्यास या कामी हजर राहण्याविषयी जाहीर नोटीस प्रसिध्द करण्यात आली. मात्र कोणीही या अर्जास हरकत नोंदविली नाही. ३. अर्जदार याने नि.क्र. १० ला स्वतःचे, नि.क्र. ११ ला सा.क्र. २ 2 संभाजी वसंतराव यादव यांचे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. अर्जदार व साक्षीदाराच्या पुराव्यावरुन कै. संभाजी बाबुराव माने यांच्या मृत्यूची तारीख २३/०५/२०२१ ही आहे हे स्पष्ट होते. अर्जदार यांच्या वडीलांच्या मृत्यूची तारीख २३/०५/२०२१ ही आहे याबाबत कोणीही हरकत दाखल केली नाही. त्यामुळे अशा हरकती अभावी व नमुद पुराव्यावरुन अर्जदार यांच्या वडीलांची मृत्यू तारीख २३/०५/२०२१ ही असून ती योग्य व बरोबर आहे हे शाबित होते. नि. क्र. ३ (१) ला असलेल्या मुख्याधिकारी रहिमतपूर नगरपरिषद, ता. कोरेगाव जि. सातारा यांच्या पत्रावरुन अर्जदार यांच्या वडीलांची मृत्यूची नोंद झाली नसल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रस्तुतचा अर्ज मंजूर करणे न्यायोचित वाटते. सबब, मी खालील आदेश पारित करीत आहे : आदेश १. अर्ज मंजूर करण्यात येतो. २. जन्म मृत्यू विवाह निबंधक, मुख्याधिकारी रहिमतपूर नगरपरिषद, ता. कोरेगाव, जि. सातारा यांनी अर्जदाराकडून कायदेशीर शुल्क जमा करुन घेवुन कै. घेवुन कै. संभाजी बाबुराव माने यांच्या मृत्यूची तारीख २३/०५/२०२१ ही आहे अशी जन्म मृत्यू अभिलेखात नोंद करावी. ३. खर्चाबाबत आदेश नाही. स्थळ : कोरेगाव ( ए.ए.पाचरणे ) दिनांक २०/१०/२०२३ न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, कोरेगाव.
ANKUSH ATMARAM PACHARNE Digitally signed by ANKUSH ATMARAM PACHARNE Date: 2023.10.20 16:17:29 +0530