State of Maharashtra vs Ganpati Gabaji Hinge
Party Details
- State of Maharashtra
- Ganpati Gabaji Hinge
Case Summary
State of Maharashtra filed Case No. 1939 in the District Court on 1 Aug 2023 against Ganpati Gabaji Hinge. The case has undergone 9 hearings over 5 months. The case is currently pending. 1 order has been issued in this matter.
Hearing History (9)
- 25JAN 2024DisposedView Order ↗
Judge: 4th CJJD AND JMFC VADGAON MAVAL
- 22DEC 2023ArgumentsView Order ↗
Judge: 4th CJJD AND JMFC VADGAON MAVAL
- 22NOV 2023ArgumentsView Order ↗
Judge: 4th CJJD AND JMFC VADGAON MAVAL
Orders (1)
- 25JAN 2024Copy of JudgmentView Order ↗
Order No: 1
Judgement DetailsView full order PDF ↗
MHPU260029132023 दाखल दिनांक नोंदणी दिनांक निकाल दिनांक कालावधी : : : : ०१-०८-२०२३ ०१-०८-२०२३ २५-०१-२०२४ ००वर्ष ०५ महिने २४दिवस (भाग - अ) मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, वडगाव मावळ यांचे न्यायालयात, (पिठासीन अधिकारी सौ. शुभांगी ज. कातकर) संक्षिप्त फौजदारी खटलाः १९३९ / २०२३ निशाणी क्रमांक ६ अभियोग पक्ष - महाराष्ट्र शासन तर्फे शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन, गुन्हा र.नं.६५/२०२२ तालुका- मावळ, जिल्हा- पुणे अभियोग पक्षातर्फे - सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री. यु.पी. ठाकरे, विरुध्द आरोपी - गणपती गबाजी हिंगे, वयः ४५ वर्षे, व्यवसायः मजुरी, रा. पिंपळखुटे, ता. मावळ, जिल्हाः पुणे. आराेपीतर्फे विद्वान वकील - श्री. विश्वनाथ जाधव (भाग - ब) न्यायनिर्णय 2 संक्षिप्त फौजदारी खटला क्र.१९३९/२०२३ गुन्हा घडल्याची तारीख दि.०५/१०/२०२२ फिर्याद दिल्याची तारीख दि. ०५/१०/२०२२ दोषषारोप पत्र दाखल केल्याची तारीख दि. ०१/०८/२०२३ पुरावा सुरु झाल्याची तारीख दि. २०/१०/२०२३ न्यायनिर्णयासाठी प्रकरण ठेवल्याची तारीख दि. २५/०१/२०२४ न्यायनिर्णयाची तारीख दि. २५/०१/२०२४ आराेपीला शिक्षा ठोठावली असेल तर त्याची तारीख निरंक (आराेपीचा तपशील) आराे पीची अ. क्र. आरोपीचे नावे अटक तारीख जामिनाव र सोडल्या ची तारीख आरोपीवर ठेवलेले दोषषारोप आरोपीना निर्दोषष किंवा दाेषषी ठरवलेली तारीख शिक्षा लाद लेली असल् यास शिक्षा वजा वट केल्या चा काला वधी १. गणपती गबाजी हिंगे १७/११ /२०२२ १७/११ /२०२२ महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कायदा कलम ६५ (ई) अन्वये २५/०१/२ ०२४ निरंक निरंक न्यायनिर्णय 3 संक्षिप्त फौजदारी खटला क्र.१९३९/२०२३ (भाग - क) (अभियाेग पक्षातर्फे साक्षीदारांची यादी) साक्षीदारांचे अनु. क्र. नाव निशाणी क्र. पुराव्याचा तपशील १. लिंबन्ना सिध्दराम कोळी ६ फिर्यादी आराेपीतर्फे तोंडी पुरावा देण्यात आलेला नाही. (अभियोग पक्षातर्फे/ आरोपीतर्फे पुरावा निशाणी क्रमांक यादी) अ.क्र. तपशील निशाणी क्रमांक १. घटनास्थळ पंचनामा १३ २. जबाब १४ ३. एफ.आय.आर १५ ४. मुद्देमाल पावती १६ ५. जप्त सॅम्पल तपासणी करीता रासायनिक प्रयोग शाळेत पाठवलेले पत्र १७ आरोपीतर्फे लेखी पुरावा देण्यात आलेला नाही. (मुद्देमाल) अ.क्र. मुद्देमालाचे वर्णन मुद्देमाल जप्त क्रमांक १. क्रमांक १. एक पांढरे रंगाचे १० लिटर मापाचे प्लास्टीकचे कॅन गावठी हातभट्टीची तयार दारुने पुर्ण भरलेले - न्यायनिर्णय 4 संक्षिप्त फौजदारी खटला क्र.१९३९/२०२३ २. गावठी हातभट्टीचे तयार दारु प्लास्टीकचे पिशवीत भरलेली, प्रत्येकी २०० मिली मापाचे प्लास्टीकचे फुगे, एकुण १५० फुगे - ३. १००/- दराच्या ५ नोटा व १० /- दराच्या ६ नोटा असे एकुण ५६०/- रुपये - ४. सॅमसंग 11 Galaxy M कंपनीचा मोबाईल - न्यायनिर्णय (पारीत केल्याची तारीख २५/०१/२०२४) आरोपींवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अन्वये दोषषारोप ठेवण्यात आलेला आहे. अभियोगपक्षाची संक्षिप्त हकिकत येणेप्रमाणेः २. फिर्यादी श्री. लिंबन्ना सिध्दराम कोळी हे शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन येथे पोलीस हवालदार म्हणुन कार्यरत होते. दिनांक ०५/१०/२०२२ रोजी पोलीस स्टेशनला हजर होते. गुप्त बातमीदारामार्फत मिळाली की, बेबडओव्हळ, पवनानगर येथे मावळ हील्स हॉटेलच्या पाठीमागे आरोपी बेकायदा दारु विक्री करत आहे. वरीष्ठांनी त्यांना कार्यवाहीचे आदेश दिले. त्यानंतर त्यांनी त्याठिकाणी छापा टाकला. त्यानंतर साहेबांनी दोन पंचांना बोलावले व बातमीचा आशय सांगितला. त्यांनी आरेापीला जागीच पकडले. त्याच्याकडील नायलॉनच्या पिशवीमध्ये १० लिटर हातभट्टी दारु व १५० दारुचे फुगे व रोख रक्कम ५६०/- व सॅंमसॅंग मोबाईल मिळुन आला. मुद्देमाल जप्त करुन त्यातील सॅम्पल तपासणी करीता काढले व सीलबंद केले व निशाणी क्र. १३ अन्वये पंचनामा केला. अशा मजकुराची तक्रार त्यांनी शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन येथे निशाणी क्र. १४ अन्वये आरोपीविरुद्ध दाखल केली. न्यायनिर्णय 5 संक्षिप्त फौजदारी खटला क्र.१९३९/२०२३ ३. वर नमुद मजकुराची फिर्याद फिर्यादीने शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनला दिली. त्यानुसार, गुन्हा रजिस्टर क्र. ६५/२०२२ ची नोंद होऊन महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम ६५ (ई) अन्वये नोंदविण्यात आला. तपासी अमंलदार आर.एस.ठाकर, पोलीस उपनिरीक्षक यांनी साक्षीदारांचे बयान त्यांच्या सांगण्याप्रमाणे घेतले. तसेच, त्यांनी घटनास्थळ पंचनामा तयार केला. तपासाअंती पोलीस ठाणे अमंलदार यांनी आरोपींविरुध्द दोषषारोप पत्र दाखल केले. ४. मी आरोपीविरुध्द निशाणी क्र. ६ वर दोषषारोप निश्चीत केले. त्यातील माहिती त्याला मराठी भाषषेत समजावून सांगितली. त्यांना समजल्यानंतर त्यांची जबानी नोंदविण्यात आली. ण्यात आली. आरोपीनी त्यांच्याविरुध्द निश्चित केलेले दोषषारोप नाकारले व संपरिक्षेची मागणी केली. ५. आरोपीचे फौजदारी प्रक्रिया संहीता कलम ३१३(१)(ब) चे निवेदन निशाणी क्र. ६ अन्वये नोंदविण्यात आले. ६. अभियोगपक्षाकरीता सरकारी अभियोक्ता श्री. यु.पी. ठाकरे व आरोपींचे विद्वान विधीज्ञ श्री.विश्वनाथ जाधव यांचा युक्तिवाद ऐकला. ७. अभियोग पक्षाच्या कथेवरुन माझ्यासमोर खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थि त झाले व त्यावर मी पुढीलप्रमाणे कारणांसहीत निष्कर्ष नोंदवित आहे. अ.क्र. मुद्दे निष्कर्ष १. दिनांक ०५/१०/२०२२ राेजी १८.३० वाजताच्या सुमारास मौजे बेबडओव्हळ गावच्या हद्दीत मावळ हिल्स हॉटेलचे पाठीमागे झाडाच्य आडोशाला आरोपी हा गावठी हातभट्टीची तयार दारु ओळखीच्या लोकांना बेकायदेशीररित्या विक्री करतांना मिळुन आला व त्याद्वारे नकारार्थी न्यायनिर्णय 6 संक्षिप्त फौजदारी खटला क्र.१९३९/२०२३ त्याने महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५(ई) अन्वये गुन्हा केला असे अभियोगपक्षाने सिद्ध केले आहे का? २. आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे कारणमिमांसा मुद्दा क्र . १ करीताः ८. फिर्यादीने निशाणी क्र. १४ वरील तक्रारी प्रमाणे साक्ष दिली. अभियोग पक्षाने त्यांच्या साक्षीतुन निशाणी क्र. १६ वरील मुद्देमाल पावती, निशाणी क्र.१७ वरील प्रयोग शाळेला पाठवलेले पत्र शाबीत केले. त्यांच्या उलटतपासात असे आले आहे की, घटनास्थळावर बोगस गि-हाईक पाठविले नव्हते. त्यांना उलटतपासामध्ये विचारण्यात आलेल्या इतर प्रश्नांची उत्तरे त्यांनी नाकारली. ९. अभियोगपक्षांने तपासलेल्या साक्षीदाराचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, आरोपींच्या ताब्यातून हातभट्टीची तयार दारु जप्त करण्यात आली. परंतु या कामी रासायनिक पृथ्थकरण अहवाल प्राप्त नाही. म्हणून अभियोगपक्षाने तपासलेल्या साक्षीदाराच्या साक्षीवरुन आरोपीच्या ताब्यातून कथीतरित्या प्रोव्हीबीशन माल देशी दारु जप्त करण्यात आली हे पुराव्यानिशी सिध्द होत नाही. म्हणून मी या निष्कर्षाप्रत पोहोचते की, दिनांक ०५/१०/२०२२ राेजी १८.३० वाजताच्या सुमारास मौजे बेबडओव्हळ गावच्या हद्दीत मावळ हिल्स हॉटेलचे पाठीमागे झाडाच्य आडोशाला आरोपी हा गावठी हातभट्टीची तयार दारु ओळखीच्या लोकांना बेकायदेशीररित्या विक्री करतांना मिळुन आला असे अभियोगपक्षाने सिध्द केले नाही. सबब, मी मुद्दा क्र.१ चे उत्तर नकारार्थी देत आहे. मुद्दा क्र . द्दा क्र . २ करीता न्यायनिर्णय 7 संक्षिप्त फौजदारी खटला क्र.१९३९/२०२३ १०. वरील विवेचनावरुन हे स्पष्ट होते की, अभियोगपक्षाने आरोपीविरुध्द दोषष सिध्द केला नाही. म्हणून आरोपीची सबळ पुराव्या अभावी निर्दोषष मुक्तता करणे आवश्यक आहे. मुद्देमाल अभिलेखावर दाखल नाही. जप्त मुद्देमाल रक्कम रुपये ५६०/- ची रोख रक्कम ही अपीलाच्या कालावधीनंतर सरकार जमा करणेबाबत पोलीसांना आदेशीत करण्यात येत आहे. जप्त मुद्देमाल सॅमसंग 11 Galaxy M कंपनीचा मोबाईल हा अभिलेखावर दाखल नाही. तो मुळ मालकास परत करणे बाबत पोलीसांना आदेशीत करण्यात येत आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ४३७(अ) अन्वयेच्या तरतुदीनुसार वरिष्ठ न्यायालयात अपीलामध्ये किवा न्यायनिर्णयाविरुध्द याचिकेमध्ये नोटीस मिळाल्यावर हजर राहण्याकरीता आरोपीने पुढील सहा महिन्यापर्यंत कायम राहील असे रुपये १५,०००/- चे वैयक्तिक बंधपत्र दाखल करावे असा आदेश करणे योग्य ठरेल. सबब, मी पुढील आदेश पारित करीत आहे. आदेश १. आरोपी गणपती गबाजी हिंगे यांची महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५(ई) च्या अपराधातून फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ कलम २५५ (१) अन्वये निर्दोषष मुक्त करण्यात येत आहे. २. आरोपीचे बंधपत्र रद्द करण्यात येत आहे. ३. जप्त मुद्देमाल रक्कम रुपये ५६०/- ची रोख रक्कम ही अपीलाच्या कालावधीनंतर सरकार जमा करणेबाबत पोलीसांना आदेशीत करण्यात येत आहे. ४. जप्त मुद्देमाल सॅमसंग 11 Galaxy M कंपनीचा मोबाईल हा अभिलेखावर दाखल नाही. तो मुळ मालकास परत करणे बाबत पोलीसांना आदेशीत करण्यात येत आहे. ५. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ४३७(अ) अन्वयेच्या तरतुदीनुसार वरिष्ठ न्यायनिर्णय 8 संक्षिप्त फौजदारी खटला क्र.१९३९/२०२३ न्यायालयात अपिलामध्ये किंवा न्यायनिर्णयाविरुध्द याचिकेमध्ये नोटीस मिळाल्यावर हजर राहण्याकरिता आरोपीने पुढील सहा महिन्यांपर्यंत कायम राहिल असे रुपये १५,०००/- चे वैयक्तिक बंधपत्र दाखल करावे. (न्यायनिर्णय खुल्या न्यायालयात घोषषीत करण्यात आला.) /- Sd (सौ. शुभांगी ज. कातकर) दिनांकः २५/०१/२०२४ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, वडगाव मावळ वडगाव, ता.मावळ, जि. पुणे न्यायनिर्णय 9 संक्षिप्त फौजदारी खटला क्र.१९३९/२०२३ CERTIFICATE I affirms that the contents of this P.D.F file Judgment/Order are same word for as per original order.
UPLOAD DATE TIME Name of Stenographer 25/01/2024 03.
1/2024 03.00 p.m.
J.R.Chikhale (Grade-III) Name of the Judge(with designation) Smt.
S.J.Katkar, 4th Jt.
C.J.J.D. & J.M.F.C.
Vadgaon Maval, Pune Date of Pronouncement of Judgment 25/01/2024 Judgment Typed on 25/01/2024 Judgment signed by P.O. on 25/01/2024 Judgment uploaded on 25/01/2024