State of Maharashtra vs Shaikh Sufyan Najimoddin
Party Details
- State of Maharashtra
- Shaikh Sufyan Najimoddin
Case Summary
State of Maharashtra filed Case No. 153 in the District Court on 3 Aug 2023 against Shaikh Sufyan Najimoddin. The case has undergone 6 hearings over 4 months. The case is currently pending. 1 order has been issued in this matter.
Hearing History (6)
- 7DEC 2023DisposedView Order ↗
Judge: 2nd Jt. C J J D and J M F C., Jamner
- 6DEC 2023EvidenceView Order ↗
Judge: 2nd Jt. C J J D and J M F C., Jamner
- 21NOV 2023EvidenceView Order ↗
Judge: 2nd Jt. C J J D and J M F C., Jamner
Orders (1)
- 7DEC 2023Copy of JudgmentView Order ↗
Order No: 1
Judgement DetailsView full order PDF ↗
न्यायनिर्णय 1 नि.फौ.ख.क्र. १५३/२०२३ दाखल तारीख : ०३.०८.२०२३. नोंदणणी तारीख : ०३.०८.२०२३. निकाल तारीख : ०७.१२.२०२३. कालावधी : ०० व.०४ म.०४ दि. जामनेर येथील ३ रे न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग यांचे न्यायालयात (पिठासीन अधिकारी - पी . व्ही . सुर्यवंशी ) नियमीत फौजदारी खटला क्रं . १५३ / २०२३ (नि . क्र . ) महाराष्ट्र सरकार तर्फे पोलिस ठाणणे, पहुर ... अभियाेगग पक्ष विरुध्द शेख सुफयान नाजीमोद्दीन. वय – २४ वर्षे, व्यवसाय – मजूरी, रा. बडा मोहल्ला पहुर ता.जामनेर जि.जळगगांव ... आरोपी --------------------------- सरकारतर्फे अधिवक्ता - श्रीमती.आर.आर.चव्हाणण. फिर्यादीतर्फे अधिवक्ता - श्री.के.एच.चौधरी. आरोपीतर्फे अधिवक्ता - श्री.एस.आर.पाटील. --------------------------- न्या य नि र्ण य ( घोषित तारीख ०७ . १२ . २०२३ ) आरोपीविरुध्द या न्यायालयात भारतीय दंड संहिता कलम ३६३ प्रमाणणे खटला चालविण्यात आला. प्रस्तुत खटल्याची थोडक्यात हकीकत अशी की - २. दिनांक ११.०९.२०२१ राेजी तक्रारदार सलीम शेख नियाज मोहंम्मद यांनी पोलीस ठाणणे पहुर येथे तक्रार दाखल केली. तक्रारदाराच्या म्हणणण्यानुसार दि.१०.०९.२०२१ रोजी शुक्रवार असल्याने दुपारी ०१ः३० वाजेच्या सुमारास ते नमाज न्यायनिर्णय 2 नि.फौ.ख.क्र. १५३/२०२३ पठणणासाठी मज्जीदमध्ये गगेले हाेते. त्यानंतर दुपारी ०२ः०० वाजेच्या सुमारास फिर्यादी घरी परत आले असता त्यांना पुढच्या खोलीमधील कपाट उघडे दिसले व त्यातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले होते. फिर्यादीने कपाटात पाहिले असता दिड लाख रुपये, त्यांच्या पत्नीचे मंगगळसुत्राची पोत, मुलगगी खुशी हिचे आधारकार्ड असे दिसले नाही. त्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीला विचारले की, मुलगगी खुशी घरात दिसत नाही त्यानंतर त्यांच्या पत्नीने त्यांना सांगितले की, त्या मागगील खोलीत नमाज पठणण करीत होत्या व खुशी पुढच्या खोलीत होती व ती कुठे गगेली त्यांना माहिती नाही. त्यानंतर फिर्यादीने मुलगगी खुशी चा आजूबाजूच्या परीसरात शोध घेतला असता त्यांना माहिती मिळाली की, गगल्लीतील सुफयान हा देखील दुपारी ०२ः०० वाजल्यापासून घरातून कुठेतरी बाहेरगगावी निघून गगेला. सदरवेळी फिर्यादीची खात्री झाली की, सुफयान याने मुलगगी खुशी हिला फुस लावून कायदेशीर रखवालीतून पळवून नेले. त्यानंतर फिर्यादीचा पुरवणणी तपासटिपणण नोंदविण्यात आला. ण्यात आला. सदर तपासटिपणणमध्ये त्यांनी सांगितले की, दिड लाख रुपये त्यांना त्यांच्या घरातच दुस-या खोलीत गगादीच्या खाली मिळून आले. सदर आशयाची फिर्यादीने तक्रार नोंदविली. ३. सदर तक्रारीवरुन अपराध क्र. ३२९/२०२१ पोलिस स्टेशन, पहुर येथे नोंद झाला. घटनेचा तपास पो.ह.श्री.प्रकाश पाटील यांनी केला. तपासादरम्यान त्यांनी घटनास्थळ पंचनामा बनविला. साक्षीदारांचे जबाब त्यांच्या सांगगण्याप्रमाणणे नोंदवले. संपूर्ण तपासाअंती प्रस्तुतच्या आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. ४. आरोपीविरुध्द नि.क्र.०८ खाली भारतीय दंड संहिता कलम ३६३ प्रमाणणे दोषारोप निश्चित केला. सदर दोषारोपातील मजकुर आरोपीला वाचुन दाखविला व समजावुन सांगितला असता आरोपीने गगुन्हा मान्य नसल्याचे निवेदन केले व संपरिक्षेची मागगणण ी केली म्हणणुन खटल्याचे कामकाज पुढे चालू केले. ५. आरोपीने सदरचे अपराधाचे कृत्य केले आहे याच्या शाबितीसाठी अभियोगग पक्षाने फिर्यादीची साक्ष नोंदविली. आरोपीविरुध्द पुरावा पटलावर न आल्यामुळे त्यांचे फौ.व्य.सं.कलम ३१३ मधील तरतुदीनुसार जबानी नोंदवली नाही. शेवटी सरकारी न्यायनिर्णय 3 नि.फौ.ख.क्र. १५३/२०२३ अभियोक्ता श्रीमती.आर.आर.चव्हाणण व बचाव पक्षाचे अधिवक्ता श्री.एस.आर.पाटील यांचा युक्तिवाद ऐकला. ६. अभियोगग पक्षाने सादर केलेला मौखि क व कागगदोपत्री पुरावा व आरोपीने घेतलेला बचाव यांचे एकत्रितपणणे काळजीपुर्वक अवलोकन केले असता खालील निर्णय प्रश्न उपस्थि त झाले. त्या निर्णय प्रश्नांचे कारणणासहीत निष्कर्ष खालीलप्रमाणणे. क्र. मुद्दे निष्कर्ष १. दि.१०.०९.२०२१ रोजी दुपारी ०१ः३० ते ०२ः०० वाजेच्या दरम्यान बडा मोहल्ला पहुर पेठ येथून आरोपीने फिर्यादीच्या मुलीला त्यांच्या कायदेशीर रखवालीतून फुस लावून पळूवन नेल्याचे अभियोगगपक्षाने सिध्द केले आहे काय ? नाही २. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणणे का र णण मि मां सा ७. आरोपीने अपराधाचे कृत्य केले आहे याच्या शाबितीसाठी अभियोगग पक्षाने फिर्यादीची साक्ष नोंदवीली. मुद्दा क्रमांक १ बाबत:- ८. अभियोगग पक्षाने उपरोक्त सादर केलेल्या मौखि क व कागगदोपत्री पुराव्याचेगग ुणणदोषावर अवलोकन करण्यापुर्वी प्रामुख्याने नमुद करावे लागगेल की, प्रचलित न्यायतत्व प्रणणालीनुसार आरोपीचे अपराधाचे कृत्य शाबीत करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही अभियाेगग पक्षावर असते. ९. र असते. ९. साक्षीदार सलीम शेख हे फिर्यादी असुन त्यांची साक्ष पाहिली असता असे दिसुन येते की, त्यांनी अभियोगग पक्षाला सहकार्य केले नाही. फिर्यादीने असे कथन केले आहे की, दि.१०.०९.२०२१ रोजी खुशी रागगाच्या भरात घरातून निघून गगेली होती. खुशी हिला आरोपीने पळून नेले असे काही घडले नसल्याचे फिर्यादीने कथन केले. न्यायनिर्णय 4 नि.फौ.ख.क्र. १५३/२०२३ १०. फिर्यादीचा अभियोगग पक्षातर्फे पुरेपुर उलटतपास घेण्यात आला परंतू त्यांचा काही एक उपयोगग झाला नाही. अभियोगग पक्षातर्फे विचारण्यात आलेले सुचक प्रश्न फिर्यादीने नाकारले. फिर्यादीने असेही कथन केले की, खुशी हिचे लग्न झाले असून ती तिच्या सासरी नांदत आहे. फिर्यादीचा आरोपीतर्फे उलटतपास घेण्यात आला सदर उलटतपासात फिर्यादीने असे कथन केले की, खुशी न्यायालयात साक्ष देण्यासाठी येवू शकत नाही कारणण ती तिच्या सासरी नांदत आहे. ११. फिर्यादीने अभियोगग पक्षाला सहकार्य केले नाही त्यामुळे अभियोगगपक्ष आरोपीविरुध्द लावलेले दोषारोप निर्विवादपणणे सिध्द करु शकत नाही. म्हणणुन मी निर्णय प्रश्न क्र. १ चे निष्कर्ष नकारार्थी देत आहे. म्हणणुन आरोपी निर्दाेष होण्यास पात्र आहे. निर्णय प्रश्न क्र. २ च्या उत्तरादाखल मी पुढील आदेश पारीत करीत आहे. आ दे श १. आरोपी शेख सुफयान नाजीमोद्दीन यांची फौजदारी व्यवहार संहिता कलम २४८ (१) मधील तरतुदीनुसार त्यांचेवर निश्चित करण्यात आलेल्या भारतीय दंड संहिता कलम ३६३ च्या अपराधातुन निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. २. आरोपीचा वैयक्तीक जातमुचलका व बंधपत्र रद्द करण्यात आले आहे. ३. आरोपीने फौजदारी व्यवहार संहिता कलम ४३७-अ अंतर्गत रक्कम रु. ५,०००/- चा वैयक्तीक जातमुचलका व बंधपत्र न्यायालयात सादर करावे. जामनेर (पी. व्ही. सुर्यवंशी) दिनांक ०७.१२.२०२३. ३ रे न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, जामनेर