Meta Pixel
CNR: --
PENDING

Abhijit S/o Omprakash Kamble vs Suhas S/o Ratnakar Morey Prop Of Revti Associates And Infrastructures Pvt Ltd.

Case NumberCC/15/107
Date of Filing13 May 2015
Case TypeConsumer Case(CC)
Last Hearing18 Sept 2015
State--
City--
Year of Filing2015

Party Details

Petitioner
  • Abhijit S/o Omprakash Kamble
Respondent
  • Suhas S/o Ratnakar Morey Prop Of Revti Associates And Infrastructures Pvt Ltd.

Case Summary

Abhijit S/o Omprakash Kamble filed Case No. CC/15/107 in the Consumer Court on 13 May 2015 against Suhas S/o Ratnakar Morey Prop Of Revti Associates And Infrastructures Pvt Ltd.. The case has undergone 8 hearings over 3 months. The case is currently pending. 8 orders have been issued in this matter.

Hearing History (8)

  • 18SEP 2015
    Hearing

    Judge: N/A

    Stage: DISPOSED OFF

  • 5SEP 2015
    Hearing

    Judge: N/A

    Stage: ADJOURN

  • 19AUG 2015
    Hearing

    Judge: N/A

    Stage: ADJOURN

  • 23JUL 2015
    Hearing

    Judge: N/A

    Stage: ADJOURN

  • 14JUL 2015
    Hearing

    Judge: N/A

    Stage: ADJOURN

  • 1JUL 2015
    Hearing

    Judge: N/A

    Stage: ADMIT

  • 20JUN 2015
    Hearing

    Judge: N/A

    Stage: ADMIT

  • 19MAY 2015
    Hearing

    Judge: N/A

    Stage: REGISTERED

Orders (8)

  • 18SEP 2015
    judgement

    Order No: N/A

  • 5SEP 2015
    order

    Order No: N/A

  • 19AUG 2015
    order

    Order No: N/A

  • 23JUL 2015
    order

    Order No: N/A

  • 14JUL 2015
    order

    Order No: N/A

  • 1JUL 2015
    order

    Order No: N/A

  • 20JUN 2015
    order

    Order No: N/A

  • 19MAY 2015
    order

    Order No: N/A

Judgement Details

Cause Title/Judgement-Entry ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR New Administrative Building No.-1 3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001 Ph.0712-2546884 Complaint Case No.

CC/15/107 1.

Abhijit S/o Omprakash Kamble Occ.

Service R/o Flat No.443 Ambedkar Nagar Dharampeth Nagpur Nagpur Maharashtra ...........Complainant(s) Versus 1.

Suhas S/o Ratnakar Morey Prop Of Revti Associates And Infrastructures Pvt Ltd.

Occ.

Service R/O Plot No.

52 Ghudghe lay-out Bhamti Nagpur-22 Nagpur Maharashtra ............Opp.Party(s) BEFORE: HON'BLE MR.

Shekhar P.Muley PRESIDENT HON'BLE MR.

Nitin Manikrao Gharde MEMBER HON'BLE MRS.

Manisha Yashwant Yeotikar MEMBER For the Complainant: For the Opp.

Party: ORDER - निकालपत्र – (पारित व्‍दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्‍यक्ष) ( पारित दिनांक-18 सप्‍टेंबर, 2015 ) 01. उपरोक्‍त नमुद तिन्‍ही तक्रारदारांनी मंचा समक्ष ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली दाखल केलेल्‍या तक्रारी हया जरी वेगवेगळया दाखल केलेल्‍या असल्‍या तरी नमुद तिन्‍ही तक्रारींमधील विरुध्‍दपक्ष हे एकच आहेत आणि तपशिलाचा थोडाफार भाग वगळता ज्‍या कायदे विषयक तरतुदींचे आधारे हया तक्रारी निकाली निघणार आहेत, त्‍या कायदे विषयक तरतुदी सुध्‍दा तिन्‍ही तक्रारींमध्‍ये एक सारख्‍याच आहेत आणि म्‍हणून आम्‍ही तिन्‍ही तक्रारीं मध्‍ये एकत्रितरित्‍या निकाल पारीत करीत आहोत.

02. तिन्‍ही तक्रारीं मधील थोडक्‍यात मजकूर खालील प्रमाणे असा आहे की- विरुध्‍दपक्ष हा रेवती असोसिएटस आणि इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर प्रायव्‍हेट लिमिटेड या कंपनीचा मालक असून त्‍याने तक्रारदारांना असे सांगितले की, त्‍याचे मालकीचा भूखंड असून त्‍यावर तो फ्लॅट व बंगले बांधून वाजवी दराने विक्री करणार आहे. त्‍यानुसार तक्रारदारानीं आगाऊ रक्‍कम देऊन बंगले व फ्लॅट खरेदी करण्‍याचा करार केला, त्‍याचे विवरण “परिशिष्‍ठ-अ” मध्‍ये दर्शविल्‍या प्रमाणे खालील प्रमाणे- “परिशिष्‍ठ-अ” अक्रं ग्राहक तक्रार क्रमांक व तक्रारकर्त्‍याचे नाव विरुध्‍दपक्षा कडून कराराव्‍दारे खरेदी करण्‍यात येणा-या मालमत्‍तेचे वर्णन कराराव्‍दारे मालमत्‍तेची मूळ किंमत करारा नुसार तक्रारदारांनी फ्लॅट व बंगलो पोटी विरुध्‍दपक्ष फर्म मध्‍ये अदा केलेली एकूण रक्‍कम 1 रक्‍कम 1 CC-15/106 मनोहर गोविंदराव सदावर्ती बंगला क्रं-RH-25 E Type 775.008 Sq.Ft.

10,51,000/- 2,10,000/- 2 CC-15/107 अभिजीत ओमप्रकाश कांबळे फ्लॅट क्रं-603 1320.00 Sq.Ft.

13,79,400/- 2,76,000/- 3 CC-15/108 श्रीमती आशा लिलाधर श्रीवास्‍तव बंगला क्रं-RH-35 E Type 775.008 Sq.Ft.

10,51,000/- 2,10,000/- तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, विरुध्‍दपक्षा तर्फे फ्लॅट व बंगलोचे बांधकाम हे मौजा वागधरा, पटवारी हलका क्रं-46, खसरा क्रं-80 व 81/2 तहसिल हिंगणा, जिल्‍हा नागपूर येथील भूखंडावर करण्‍याचे प्रस्‍तावित असून बांधकाम करण्‍यात येणा-या प्रस्‍तावित योजनेचे नाव “रेवती गोपी हिल टॉप” असे आहे. तक्रारदारां तर्फे पुढे असे नमुद करण्‍यात आले की, विरुध्‍दपक्ष रेवती असोसिएटस आणि इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर प्रायव्‍हेट लिमिटेड या फर्मशी ग्राहक तक्रार क्रमांक-15/106 मधील तक्रारकर्ता श्री मनोहर गोविंदराव सदावर्ती आणि ग्राहक तक्रार क्रं-15/108 मधील तक्रारकर्ती श्रीमती आशा श्रीवास्‍तव यांनी प्रस्‍तावित बंगला विकत घेण्‍या विषयी विक्रीचे करारनामे दिनांक-11 ऑक्‍टोंबर, 2011 रोजी केलेत. तर ग्राहक तक्रार क्रमांक-15/107 मधील तक्रारकर्ता श्री अभिजीत कांबळे यांनी विरुध्‍दपक्ष फर्मशी प्रस्‍तावित फ्लॅट विकत घेण्‍याचा करार दिनांक-07 जुलै, 2012 रोजी केला. तक्रारदारांनी करारा प्रमाणे विकत घेण्‍याचे मालमत्‍ते संबधाने वर नमुद केल्‍या प्रमाणे रकमा विरुध्‍दपक्षास अदा केल्‍यात. विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे करारनामा झाल्‍याचे दिनांका पासून 18 महिन्‍याचे आत बांधकाम पूर्ण करुन करारातील नमुद मालमत्‍तेचे नोंदणीकृत विक्रीपत्र व ताबा देण्‍याचे आश्‍वासन कराराव्‍दारे दिले. तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे करारात नमुद केल्‍या प्रमाणे प्रस्‍तावित बंगलो/फ्लॅटचे बांधकाम पूर्ण केले नाही. तक्रारदारांनी वेळोवेळी विरुध्‍दपक्षास उर्वरीत रक्‍कम स्विकारुन करारातील नमुद मालमत्‍तेचे विक्रीपत्र नोंदवून देऊन ताबा देण्‍या विषयी सुचित केले परंतु विरुध्‍दपक्षा तर्फे त्‍यांना समाधानकारक उत्‍तरे देण्‍यात आली नाहीत व योग्‍य तो प्रतिसाद मिळाला नाही. त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष रेवती असोसिएटस आणि इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर प्रायव्‍हेट लिमिटेड या फर्म तर्फे तक्रारदारांना दिनांक-19.12. ांक-19.12.2014 रोजीचे पत्र देण्‍यात येऊन त्‍याव्‍दारे कळविले की, ते तक्रारदारांनी करारातील मालमत्‍तेपोटी दिलेली रक्‍कम व्‍याजासह परत करण्‍यास तयार आहेत. त्‍याप्रमाणे विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे ग्राहक तक्रार क्रं-15/106 आणि क्रं-15/108 मधील तक्रारदार अनुक्रमे श्री मनोहर गोविंदराव सदावर्ती आणि श्रीमती आशा लिलाधर श्रीवास्‍तव यांना प्रत्‍येकी रुपये-3,30,000/- चे धनादेश देण्‍यात आलेत तर ग्राहक तक्रार क्रं-15/107 मधील तक्रारकर्ता श्री अभिजीत ओमप्रकाश कांबळे यांना रुपये-2,76,000/- रकमेचा धनादेश दिला. परंतु जेंव्‍हा तक्रारदारांनी विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे दिलेले धनादेश वटविण्‍यासाठी बँकेत जमा केले त्‍यावेळी सदरचे धनादेश हे “अपर्याप्‍त निधी” या कारणांवरुन न वटता परत आलेत. तक्रारदारांनी ही बाब विरुध्‍दपक्षाचे लक्षात आणून दिली परंतु त्‍यावर त्‍यांना कुठलेही समाधानकारक उत्‍तर मिळाले नाही. म्‍हणून शेवटी तिन्‍ही तक्रारदारांनी स्‍वतंत्ररित्‍या विरुध्‍दपक्षा विरुध्‍द तक्रारी मंचा समक्ष दाखल करुन खालील प्रकारच्‍या मागण्‍या केल्‍यात- (1) विरुध्‍दपक्षाने करारा प्रमाणे नमुद मालमत्‍तेचे संपूर्ण बांधकाम करुन विक्रीपत्र त्‍या-त्‍या तक्रारकर्त्‍याचे नावे नोंदवून ताबा देण्‍याचे आदेशित व्‍हावे. (2) विरुध्‍दपक्षास करारातील नमुद मालमत्‍तेचे विक्रीपत्र नोंदवून देणे शक्‍य नसल्‍यास ग्राहक तक्रार क्रं-15/106 मधील तक्रारकर्ता श्री मनोहर गोविंदराव सदावर्ती यांनी करारातील मालमत्‍ते संबधाने विरुध्‍दपक्ष फर्म मध्‍ये जमा केलेली एकूण रक्‍कम रुपये-2,10,000/- तसेच ग्राहक तक्रार क्रं-15/107 मधील तक्रारकर्ता श्री अभिजीत ओमप्रकाश कांबळे यांनी करारातील मालमत्‍ते संबधाने विरुध्‍दपक्ष फर्म मध्‍ये जमा केलेली एकूण रक्‍कम रुपये-2,76,000/- आणि ग्राहक तक्रार क्रं-15/108 मधील तक्रारकर्ती श्रीमती आशा लिलाधर श्रीवास्‍तत यांनी करारातील नमुद मालमत्‍ते संबधाने विरुध्‍दपक्ष फर्म मध्‍ये जमा केलेली एकूण रक्‍कम रुपये-2,10,000/- संबधाने विरुध्‍दपक्ष फर्म मध्‍ये जमा केलेली रक्‍कम कराराचे दिनांका पासून द.सा.द.शे.24% दराने व्‍याजासह त्‍या-त्‍या तक्रारकर्त्‍यास परत करण्‍याचे विरुध्‍दपक्षास आदेशित व्‍हावे. त व्‍हावे. (3) तक्रारदारांना झालेल्‍या नुकसानी संबधाने भरपाई म्‍हणून प्रत्‍येकी रुपये-5,00,000/-आणि खर्चा बद्दल प्रत्‍येकी रुपये-30,000/- विरुध्‍दपक्षा कडून मिळावे.

03. उपरोक्‍त नमुद तिन्‍ही तक्रारींमध्‍ये स्‍वतंत्ररित्‍या यातील विरुध्‍दपक्षास नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविण्‍यात आली. तिन्‍ही तक्रारींमध्‍ये तक्रारनिहाय नोटीस विरुध्‍दपक्षावर तामील झाल्‍या बाबत रजिस्‍टर पोस्‍टाच्‍या पोच अभिलेखावर दाखल आहेत. परंतु नोटीस मिळूनही विरुध्‍दपक्ष कुठल्‍याही तक्रारीत हजर झाले नाही व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे मांडले नाही म्‍हणून तिन्‍ही तक्रारींमध्‍ये विरुध्‍दपक्षा विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश मंचा तर्फे दिनांक-23.07.2015 रोजी पारीत करण्‍यात आला.

04. तिन्‍ही तक्रारदारांनी आप-आपल्‍या तक्रारीचे समर्थनार्थ त्‍यांनी विरुध्‍दपक्ष फर्म सोबत मालमत्‍ता विक्री संबधाने केलेल्‍या करारनाम्‍याच्‍या प्रती, तसेच करारातील नमुद मालमत्‍ते संबधी विरुध्‍दपक्ष फर्ममध्‍ये रकमा जमा केल्‍या बाबत विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे निर्गमित करण्‍यात आलेल्‍या पावत्‍यांच्‍या प्रती, विरुध्‍दपक्षाने तक्रारदारांना दिलेल्‍या पत्राच्‍या प्रती दाखल केल्‍यात. तसेच तक्रारनिहाय लेखी युक्‍तीवाद आणि मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निवाडयांच्‍या प्रती दाखल केल्‍यात. तिन्‍ही तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या तक्रारी आणि दाखल दस्‍तऐवजांचे अवलोकन करण्‍यात आले. तसेच तक्रारदारांचे वकील श्री बारई यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकल्‍या नंतर मंचाचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे देण्‍यात येतो- ::निष्‍कर्ष :: 05. तक्रारदारांनी विरुध्‍दपक्ष फर्म सोबत प्रस्‍तावित मालमत्‍ता विकत घेण्‍या विषयी केलेल्‍या करारनाम्‍याची प्रती अभिलेखावर दाखल केल्‍यात, त्‍याचे वचन केल्‍यावर हे स्‍पष्‍ट होते की, तक्रारदारांनी, विरुध्‍दपक्ष रेवती असोसिएटस आणि इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर प्रायव्‍हेट लिमिटेड, नागपूर-440022 या फर्म सोबत उपरोक्‍त वर्णनातीत मालमत्‍ता खरेदी करण्‍या बाबत स्‍वतंत्र करार केले होते. तसेच तक्रारदारांनी विरुध्‍दपक्ष फर्मला करारातील नमुद मालमत्‍ते संबधाने ज्‍या रकमा अदा केल्‍यात त्‍याचा पण उल्‍लेख करारात केलेला आहे. ेलेला आहे. त्‍याशिवाय विरुध्‍दपक्ष फर्मने करारातील नमुद मालमत्‍ते संबधाने तक्रारदारां कडून मिळालेल्‍या रकमां संबधाने निर्गमित करण्‍यात आलेल्‍या पावत्‍यांच्‍या प्रती तक्रारदारांनी अभिलेखावर दाखल केलेल्‍या आहेत. या दस्‍तऐवजां वरुन हे सिध्‍द होते की, तक्रारदारांनी विरुध्‍दपक्ष फर्मचे “रेवती गोपी हिल टॉप” या प्रस्‍तावित योजनेतील बंगले व फ्लॅट विकत घेण्‍या विषयीचा करार केला होता व त्‍याअनुषंगाने विरुध्‍दपक्ष फर्मला काही रक्‍कम पण दिली होती.

06. विरुध्‍दपक्षाने तक्रारदारांना स्‍वतंत्ररित्‍या दिनांक-19.12.2014 रोजीचे पत्राव्‍दारे असे कळविले होते की, त्‍यांनी सदर्हू भूखंडा वरील बांधकामाचा नकाशा नागपूर सुधार प्रन्‍यासकडे मंजूरीसाठी सादर केलेला असून त्‍यास 18 ते 20 दिवसात मंजूरी मिळण्‍याची शक्‍यता आहे. तसेच तक्रारदारांचे प्रस्‍तावित मालमत्‍तेचे संपूर्ण बांधकाम हे जानेवारी-2015 पर्यंत पूर्ण होईल असे पण कळविले. पुढे त्‍यांनी असे लिहिलेले आहे की, जर ते बांधकाम सुरु करण्‍यास असमर्थ ठरले वा करु शकले नाही तर तक्रारदारांनी दिलेली रक्‍कम ते बँकच्‍या व्‍याज दराने दिनांक-31 जानेवारी, 2015 पासून पंधरा दिवसांचे आत परत करतील.

07. विरुध्‍दपक्षा तर्फे तक्रारदारांना देण्‍यात आलेल्‍या वरील पत्रावरुन हे स्‍पष्‍ट होते की, डिसेंबर-2014 पर्यंत विरुध्‍दपक्षाने प्रस्‍तावित योजने अंतर्गत बांधकामास सुरुवातच केलेली नव्‍हती कारण त्‍यांचा बांधकाम नकाशाच नागपूर सुधार प्रन्‍यास कडून मंजूर झालेला नव्‍हता.

08. विरुध्‍दपक्ष रेवती असोसिएटस आणि इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर प्रायव्‍हेट लिमिटेड या फर्म तर्फे ग्राहक तक्रार क्रमांक-15/106 मधील तक्रारकर्ता श्री मनोहर गोविंदराव सदावर्ती आणि ग्राहक तक्रार क्रं-15/108 मधील तक्रारकर्ती श्रीमती आशा श्रीवास्‍तव यांचेशी प्रस्‍तावित बंगला विक्रीचे करारनामे स्‍वतंत्ररित्‍या दिनांक-11 ऑक्‍टोंबर, 2011 रोजी करण्‍यात आलेत तर ग्राहक तक्रार क्रमांक-15/107 मधील तक्रारकर्ता श्री अभिजीत कांबळे यांचेशी प्रस्‍तावित फ्लॅट विकत घेण्‍याचा करार दिनांक-07 जुलै, 2012 रोजी करण्‍यात आला परंतु त्‍यानंतर तीन वर्ष पर्यंत विरुध्‍दपक्ष फर्मने बांधकामा संबधी कुठलीही प्रगती केली नाही. केली नाही. तक्रारदार हे विरुध्‍दपक्षाचे ग्राहक आहेत आणि विरुध्‍दपक्षा तर्फे करारात नमुद केल्‍या प्रमाणे दिलेल्‍या आश्‍वासनात त्रृटी आहे हे वरील दस्‍तऐवजां वरुन स्‍पष्‍ट होते.

09. ग्राहक मंचा तर्फे तक्रारनिहाय नोंदणीकृत डाकेने विरुध्‍दपक्षास पाठविलेली नोटीस मिळूनही एकाही तक्रारीत विरुध्‍दपक्ष हजर झाले नाही व तक्रारदारांनी स्‍वतंत्ररित्‍या दाखल केलेल्‍या तक्रारीं मध्‍ये कुठलेही उत्‍तर सादर केले नाही वा तक्रारदारांनी विरुध्‍दपक्षावर केलेले आरोप खोडूनही काढलेले नाहीत. तक्रारदारांनी स्‍वतंत्ररित्‍या मंचा समक्ष दाखल केलेल्‍या तक्रारी या प्रतिज्ञालेखावर दाखल आहेत, त्‍यामुळे तक्रारी या गुणवत्‍तेवर निकाली काढण्‍यात येत आहेत. तक्रारदारांचे दाखल तक्रारी व दस्‍तऐवज यावरुन असा निष्‍कर्ष निघतो की, तक्रारदारांनी विरुध्‍दपक्षा विरुध्‍द दाखल केलेल्‍या तक्रारींमध्‍ये तथ्‍य आहे. सबब तिन्‍ही तक्रारी विरुध्‍दपक्ष फर्म (विरुध्‍दपक्ष फर्म म्‍हणजे “रेवती असोसिएटस आणि इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चरस प्रायव्‍हेट लिमिटेड नागपूर” असे समजण्‍यात यावे) विरुध्‍द मंजूर होण्‍यास पात्र असून त्‍यावरुन आम्‍ही तिन्‍ही तक्रारींमध्‍ये एकत्रितरित्‍या खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत- ::आदेश :: (1) ग्राहक तक्रार क्रं-15/106 मधील तक्रारकर्ता मनोहर गोविंदराव सदवर्ती तसेच ग्राहक तक्रार क्रं-15/107 मधील तक्रारकर्ता श्री अभिजीत ओमप्रकाश कांबळे आणि ग्राहक तक्रार क्रं-15/108 मधील तक्रारकर्ती श्रीमती आशा लिलाधर श्रीवास्‍तव यांनी विरुध्‍दपक्ष रेवती असोसिएटस आणि इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चरस प्रायव्‍हेट लिमिटेड नागपूर फर्म तर्फे प्रोप्रायटर सुहास रत्‍नाकर मोरे, राहणार प्‍लॉट क्रं-52, घुडगे ले-आऊट, भामटी, नागपूर-22 यांचे विरुध्‍द केलेल्‍या तक्रारी या अंशतः मंजूर करण्‍यात येतात. (2) विरुध्‍दपक्ष रेवती असोसिएटस आणि इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चरस प्रायव्‍हेट लिमिटेड नागपूर फर्म तर्फे प्रोप्रायटर सुहास रत्‍नाकर मोरे यास निर्देशित करण्‍यात येते की, या तक्रारीतील “परिशिष्‍ठ-अ” मध्‍ये दर्शविल्‍या प्रमाणे तसेच फ्लॅट/बंगलो विक्री संबधाने रेवती असोसिएटस आणि इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर प्रायव्‍हेट लिमिटेड, नागपूर-440022 तर्फे तक्रारदारांशी करण्‍यात आलेल्‍या करारनाम्‍या मधील नमुद बंगलो/फ्लॅटचे नोंदणीकृत विक्रीपत्र त्‍या-त्‍या तक्रारकर्त्‍या कडून करारा नुसार घेणे अस ार घेणे असलेली रक्‍कम अनुक्रमे ग्राहक तक्रार क्रं-15/106 मधील तक्रारदार श्री मनोहर गोविंदराव सदवर्ती यांचे कडून मालमत्‍तेची एकूण किंमत रुपये-10,51,000/- पैकी घेणे असलेली रक्‍कम रुपये-8,41,000/- (अक्षरी रुपये आठ लक्ष एक्‍केचाळीस हजार फक्‍त) तसेच ग्राहक तक्रार क्रं-15/207 मधील तक्रारदार श्री अभिजीत ओमप्रकाश कांबळी यांचेकडून मालमत्‍तेची एकूण किंमत रुपये-13,79,400/- पैकी घेणे असलेली रक्‍कम रुपये-11,03,400/-(अक्षरी रुपये अकरा लक्ष तीन हजार चारशे फक्‍त) आणि ग्राहक तक्रार क्रं-15/108 मधील तक्रारकर्ती श्रीमती आशा लिलाधर श्रीवास्‍तव यांचे कडून मालमत्‍तेची एकूण किंमत रुपये-10,51,000/- पैकी घेणे असलेली रक्‍कम रुपये-8,41,000/- (अक्षरी रुपये आठ लक्ष एक्‍केचाळीस हजार फक्‍त) या प्रमाणे उर्वरीत रकमा स्विकारुन करारातील नमुद मालमत्‍तेचे करारात व ब्राऊचरमध्‍ये दर्शविल्‍या प्रमाणे मालमत्‍तेचे संपूर्ण बांधकाम नमुद आवश्‍यक त्‍या सोयी व सुविधांसह करुन नोंदणीकृत विक्रीपत्र त्‍या-त्‍या तक्रारकर्त्‍याचे नावे नोंदवून द्दावे. करारा प्रमाणे विक्रीपत्र नोंदविण्‍यासाठी लागणारे मुद्रांक शुल्‍क व नोंदणीचा खर्च त्‍या-त्‍या तक्रारकर्त्‍यांनी त्‍यांचा त्‍यांचा सहन करावा. तसेच त्‍या-त्‍या तक्रारकर्त्‍यांना त्‍यांचे त्‍यांचे करारातील नमुद मालमत्‍तेचे संपूर्ण मोजमाप करुन प्रत्‍यक्ष ताबा द्दावा व प्रत्‍येक तक्रारकर्त्‍यास ताबा दिल्‍या बाबत ताबापत्र आणि करारातील नमुद मालमत्‍तेच्‍या आवश्‍यक दस्‍तऐवजांच्‍या प्रती त्‍या-त्‍या तक्रारकर्त्‍यास विरुध्‍दपक्षाने पुरवाव्‍यात. (3) जर केवळ काही कायदेशीर/तांत्रिक अडचणीस्‍तव विरुध्‍दपक्ष फर्मला तिन्‍ही तक्रारदारांचे नावे करारातील नमुद मालमत्‍तेचे नोंदणीकृत विक्रीपत्र त्‍या-त्‍या तक्रारदाराचे नावाने नोंदवून देणे शक्‍य नसेल तर करारातील नमुद मालमत्‍ते संबधाने विरुध्‍दपक्ष रेवती असोसिएटस आणि इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर प्रायव्‍हेट लिमिटेड, नागपूर-44022 या फर्म मध्‍ये ग्राहक तक्रार क्रं-15/106 मधील तक्रारकर्ता श्री मनोहर गोविंदराव सदावर्ती यांनी जमा केलेली एकूण रक्‍कम रुपये-2,10,000/- (अक्षरी एकूण रुपये दोन लक्ष दहा हजार फक्‍त) शेवटची मासिक किस्‍त जमा केल्‍याचा दिनांक-20.09. ांक-20.09.2011पासून तसेच ग्राहक तक्रार क्रमांक-15/107 मधील तक्रारकर्ता श्री अभिजीत ओमप्रकाश कांबळे यांनी जमा केलेली एकूण रक्‍कम रुपये-2,76,000/-(अक्षरी एकूण रुपये दोन लक्ष शहात्‍तर हजार फक्‍त) शेवटची मासिक किस्‍त जमा केल्‍याचा दिनांक-21.06.2012 पासून आणि ग्राहक तक्रार क्रं-15/108 मधील तक्रारकर्ती श्रीमती आशा लिलाधर श्रीवास्‍तव यांनी जमा केलेली एकूण रक्‍कम रुपये-2,10,000/-(अक्षरी एकूण रुपये दोन लक्ष दहा हजार फक्‍त) शेवटची मासिक किस्‍त जमा केल्‍याचा दिनांक-13.09.2011 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्‍याजासह येणारी रक्‍कम विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे त्‍या-त्‍या तक्रारकर्त्‍यास परत करावी. (4) तिन्‍ही तक्रारदारांना झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल प्रत्‍येकी रुपये-5000/- (अक्षरी प्रत्‍येकी रुपये पाच हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च म्‍हणून प्रत्‍येकी रुपये-2000/- (अक्षरी प्रत्‍येकी रुपये दोन हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे त्‍या-त्‍या तक्रारकर्त्‍यास अदा करावेत. (5) विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे प्रस्‍तुत निकालपत्रातील आदेशाचे अनुपालन, निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍या पासून तीस दिवसांचे आत करावे. (6) निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात. तिन्‍ही तक्रारींमध्‍ये निकाल एकत्रित पारीत केल्‍याने निकालपत्राची मूळ प्रत ग्राहक तक्रार क्रं-सी.सी.-15/106 मध्‍ये लावण्‍यात यावी आणि उर्वरीत ग्राहक तक्रार क्रं-सी.सी.-15/107 आणि क्रं-15/108 मध्‍ये निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती लावण्‍यात याव्‍यात. [HON'BLE MR.

Shekhar P.Muley] PRESIDENT [HON'BLE MR.

Nitin Manikrao Gharde] MEMBER [HON'BLE MRS.

Manisha Yashwant Yeotikar] MEMBER