Meta Pixel
CNR: --
PENDING

शकुंतला एकनाथ केसकर vs शाखा अधिकारी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा तेर

Case NumberCC/18/112
Date of Filing22 Mar 2018
Case TypeConsumer Case(CC)
Last Hearing27 Feb 2020
State--
City--
Year of Filing2018

Party Details

Respondent
  • मुख्य कार्यकारी अधिकारी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड उस्मानाबाद

Case Summary

शकुंतला एकनाथ केसकर vs शाखा अधिकारी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा तेर (Case No. CC/18/112) is listed in the Consumer Court, filed on 22 Mar 2018. The case has undergone 25 hearings over 1 year and 10 months. The case is currently pending. 25 orders have been issued in this matter.

Hearing History (25)

  • 27FEB 2020
    Hearing

    Judge: N/A

    Stage: DISPOSED OFF

  • 17FEB 2020
    Hearing

    Judge: N/A

    Stage: ADJOURN

  • 29JAN 2020
    Hearing

    Judge: N/A

    Stage: ADJOURN

  • 19DEC 2019
    Hearing

    Judge: N/A

    Stage: ADJOURN

  • 18NOV 2019
    Hearing

    Judge: N/A

    Stage: ADJOURN

  • 11OCT 2019
    Hearing

    Judge: N/A

    Stage: ADJOURN

  • 11SEP 2019
    Hearing

    Judge: N/A

    Stage: ADJOURN

  • 7AUG 2019
    Hearing

    Judge: N/A

    Stage: ADJOURN

  • 8JUL 2019
    Hearing

    Judge: N/A

    Stage: ADJOURN

  • 17JUN 2019
    Hearing

    Judge: N/A

    Stage: FINAL HEARING

  • 23MAY 2019
    Hearing

    Judge: N/A

    Stage: EVIDENCE

  • 22APR 2019
    Hearing

    Judge: N/A

    Stage: EVIDENCE

  • 12MAR 2019
    Hearing

    Judge: N/A

    Stage: EVIDENCE

  • 18FEB 2019
    Hearing

    Judge: N/A

    Stage: EVIDENCE

  • 29JAN 2019
    Hearing

    Judge: N/A

    Stage: EVIDENCE

  • 10JAN 2019
    Hearing

    Judge: N/A

    Stage: EVIDENCE

  • 29DEC 2018
    Hearing

    Judge: N/A

    Stage: EVIDENCE

  • 4DEC 2018
    Hearing

    Judge: N/A

    Stage: EVIDENCE

  • 20OCT 2018
    Hearing

    Judge: N/A

    Stage: EVIDENCE

  • 28SEP 2018
    Hearing

    Judge: N/A

    Stage: EVIDENCE

  • 10SEP 2018
    Hearing

    Judge: N/A

    Stage: EVIDENCE

  • 10JUL 2018
    Hearing

    Judge: N/A

    Stage: EVIDENCE

  • 25JUN 2018
    Hearing

    Judge: N/A

    Stage: EVIDENCE

  • 1JUN 2018
    Hearing

    Judge: N/A

    Stage: EVIDENCE

  • 6APR 2018
    Hearing

    Judge: N/A

    Stage: EVIDENCE

Orders (25)

  • 27FEB 2020
    judgement

    Order No: N/A

  • 17FEB 2020
    order

    Order No: N/A

  • 29JAN 2020
    order

    Order No: N/A

  • 19DEC 2019
    order

    Order No: N/A

  • 18NOV 2019
    order

    Order No: N/A

  • 11OCT 2019
    order

    Order No: N/A

  • 11SEP 2019
    order

    Order No: N/A

  • 7AUG 2019
    order

    Order No: N/A

  • 8JUL 2019
    order

    Order No: N/A

  • 17JUN 2019
    order

    Order No: N/A

  • 23MAY 2019
    order

    Order No: N/A

  • 22APR 2019
    order

    Order No: N/A

  • 12MAR 2019
    order

    Order No: N/A

  • 18FEB 2019
    order

    Order No: N/A

  • 29JAN 2019
    order

    Order No: N/A

  • 10JAN 2019
    order

    Order No: N/A

  • 29DEC 2018
    order

    Order No: N/A

  • 4DEC 2018
    order

    Order No: N/A

  • 20OCT 2018
    order

    Order No: N/A

  • 28SEP 2018
    order

    Order No: N/A

  • 10SEP 2018
    order

    Order No: N/A

  • 10JUL 2018
    order

    Order No: N/A

  • 25JUN 2018
    order

    Order No: N/A

  • 1JUN 2018
    order

    Order No: N/A

  • 6APR 2018
    order

    Order No: N/A

Judgement Details

Cause Title/Judgement-Entry DISTRICT CONSUMER REDRESSAL FORUM OSMANABAD Aria of Collector Office Osmanabad Complaint Case No.

CC/18/112 ( Date of Filing : 22 Mar 2018 ) 1. शकुंतला एकनाथ केसकर रा. तेर ता. जी. उस्मानाबाद उस्मानाबाद महाराष्ट्र ...........Complainant(s) Versus 1. शाखा अधिकारी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा तेर शाखा तेर ता. जी. उस्मानाबाद उस्मानाबाद महाराष्ट्र 2. मुख्य कार्यकारी अधिकारी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड उस्मानाबाद मुख्य कार्यालय उस्मानाबाद ता. जी. उस्मानाबाद उस्मानाबाद महाराष्ट्र ............Opp.Party(s) BEFORE: HON'BLE MR. किशोर द. वडणे PRESIDENT HON'BLE MR. मुकुंद भ. सस्‍ते MEMBER HON'BLE MR. शशांक श. क्षीरसागर MEMBER For the Complainant: For the Opp.

Party: Dated : 27 Feb 2020 Final Order / Judgement जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्‍मानाबाद. ग्राहक तक्रार क्रमांक : 112/2018. तक्रार दाखल दिनांक : 22/03/2018. तक्रार आदेश दिनांक : 27/02/2020 कालावधी: 01 वर्षे 11 महिने 05 दिवस शकुंतला एकनाथ केसकर (मयत) यांचे वारस :- (1) श्री. सिध्‍देश्‍वर एकनाथ केसकर, वय 48 वर्षे, व्‍यवसाय : शेती, रा. तेर, ता.जि. उस्‍मानाबाद. (2) श्री. रामलिंग एकनाथ केसकर, वय 42 वर्षे, व्‍यवसाय : शेती, रा. तेर, ता.जि. उस्‍मानाबाद. (3) श्री. राजेंद्र एकनाथ केसकर, वय 37 वर्षे, व्‍यवसाय : शेती, रा. तेर, ता.जि. उस्‍मानाबाद. (4) सौ. सुनंदा प्रभाकर बरे, वय 50 वर्षे, व्‍यवसाय : शेती, रा. वाणेवाडी, ता.जि. उस्‍मानाबाद. (5) सौ. आशा भारत घोंगडे, वय 48 वर्षे, व्‍यवसाय : शेती, रा. अणदूर, ता. तुळजापूर, जि. उस्‍मानाबाद. तक्रारकर्ते विरुध्‍द (1) शाखाधिकारी, दी उस्‍मानाबाद जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक लि., उस्‍मानाबाद, शाखा : तेर, ता. जि. उस्‍मानाबाद. (2) मुख्‍य कार्यकारी अधिकारी, दी उस्‍मानाबाद जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक लि., उस्‍मानाबाद, मुख्‍य कार्यालय, उस्‍मानाबाद. विरुध्‍द पक्ष गणपुर्ती :- (1) श्री. किशोर दत्‍तात्रय वडणे, अध्‍यक्ष (2) श्री. मुकुंद भगवान सस्‍ते, सदस्‍य (3) श्री. शशांक शरदचंद्र क्षीरसागर, सदस्‍य तक्रारकर्ता यांचेतर्फे विधिज्ञ :- बी.के. भक्‍ते विरुध्‍द पक्ष यांचेतर्फे प्रतिनिधी : ए.जी. कुलकर्णी आदेश श्री. आदेश श्री. किशोर दत्‍तात्रय वडणे, अध्‍यक्ष यांचे द्वारे :- 1. विरुध्‍द पक्ष क्र.1 (यापुढे विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 संक्षिप्‍त रुपामध्‍ये ‘बँक’) यांच्‍याकडे असणा-या बचत खात्‍यातील रकमेची मागणी केल्‍यानंतर सदर रक्‍कम बँकेने अदा न केल्‍यामुळे प्रस्‍तुत ग्राहक तक्रार दाखल केलेली आहे.

2. शकुंतला एकनाथ केसकर (यापुढे संक्षिप्‍त रुपामध्‍ये ‘मयत शकुंतला’) यांनी प्रस्‍तुत ग्राहक तक्रार जिल्‍हा मंचामध्‍ये दाखल केलेली आहे. ग्राहक तक्रारीच्‍या सुनावणीदरम्‍यान शकुंतला एकनाथ केसकर यांचा मृत्‍यू झाल्‍यामुळे तक्रारकर्ते क्र.1 ते 5 हे वारस नात्‍याने तक्रारीमध्‍ये समाविष्‍ठ झालेले आहेत.

3. ग्राहक तक्रारीचा आशय असा आहे की, मयत शकुंतला यांचे बँकेमध्‍ये बचत खाते क्र.10305/12735 आहे आणि प्रस्‍तुत खात्‍यामध्‍ये रु.96,719/- जमा आहेत. मयत शकुंतला यांना मुलीच्‍या शिक्षणाकरिता बचत खात्‍यातील रकमेची आवश्‍यकता होती. त्‍यामुळे मयत शकुंतला यांनी दि.6/10/2017 रोजी बँकेकडे बचत खात्‍यातील रकमेची मागणी केली असता बँकेले रक्‍कम देण्‍यास नकार दिला. त्‍यामुळे मयत शकुंतला यांनी बँकेस नोटीस पाठवून रकमेची मागणी केली; परंतु रक्‍कम परत करण्‍यासाठी बँकेने दखल घेतली नाही. बँकेने त्‍यांना द्यावयाच्‍या सेवेमध्‍ये त्रुटी निर्माण केलेली आहे. उपरोक्‍त वादविषयाचे अनुषंगाने बचत खात्‍यातील रक्‍कम रु.96,719/- व्याजासह देण्‍याचा; तसेच शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.20,000/- व तक्रार खर्चापोटी रु.5,000/- देण्‍याचा बँकेस आदेश करण्‍यात यावा, अशी विनंती मयत शकुंतला यांनी केलेली होती.

4. बँकेने अभिलेखावर लेखी निवेदन दाखल केले आहे. बँकेने मयत शकुंतला यांची तक्रार वस्‍तुस्थितीविरुध्‍द व अयोग्‍य असल्‍याचे कथन केले आहे. तसेच मयत शकुंतला ह्या तेर वि.का.से.सह.सो.लि. च्‍या सभासद आहेत आणि बँकेचे ग्राहक असल्‍याचे अमान्‍य केले आहे. मयत शकुंतला यांनी बॅंकेमध्‍ये बचत खाते ठेवले असून त्‍यामध्‍ये रु.96,719/- जमा असल्‍याचे सिध्‍द करणे आवश्‍यक आहे. मयत शकुंतला यांनी पासबुकासह पे-स्‍लीप बँकेच्‍या संबंधीत लिपीक, कॅशीअर व शाखाधिकारी यांच्‍याकडे कदापि दिलेली नाही. मयत शकुंतला ह्या दुस-या त्रयस्‍थ व्‍यक्‍तीकडे पे-स्‍लीप देऊन रकमेची मागणी करीत असल्‍यामुळे बँकेने ती स्‍वीकारली नाही. ारली नाही. तक्रारकर्ता यांना सेवा देण्‍यामध्‍ये त्‍यांनी त्रुटी केल्‍याचे त्‍यांनी अमान्‍य केले आहे. यापूर्वी बँकेने मयत शकुंतला यांना वेळोवेळी रोखता / निधी उपलब्‍धतेनुसार रक्‍कम अदा केलेली आहे. बँकेचे पुढे असे कथन आहे की, जवळपास 83 शाखांमधून बँकेने उत्‍तम बँकींग सेवा दिलेली आहे. गेल्‍या 11-12 वर्षापासून बँककरिता आर्थिक अडचणी निर्माण झालेल्‍या आहेत. मागील 5 वर्षापासून सतत दुष्‍काळ असल्‍यामुळे शेती कर्ज व बिगरशेती कर्जाची वसुली होऊ शकलेली नाही आणि बँकेकडे आवश्‍यक असणारी तरलता/निधी उपलब्‍ध न झाल्‍यामुळे तक्रारकर्ता यांच्‍या खात्‍यावरील रक्‍कम देवू शकत नाहीत. बँकेचे पुढे असे कथन आहे की, बँकेचे तत्‍कालीन चेअरमन व अधिकारी, नागपूर जि.म.स.बँकेचे चेअरमन व मे. होम ट्रेड लि. या कंपनीचे अध्‍यक्षांनी आपसात संगनमत करुन तथाकथित रोखे खरेदी व्‍यवहाराचे नांवाखाली रु.30 कोटींचा भ्रष्‍टाचार करुन विरुध्‍द पक्ष बँकेस मोठ्या अडचणीत आणलेले आहे. तसेच बँकेवर प्रशासकाची नियुक्‍ती होऊन तेरणा सहकारी साखर कारखाना व श्री तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना यांचेकडे जवळपास रु.350 कोटीचे कर्ज थकीत झाले. त्‍याबाबत सरफासी कायद्यानुसार वसुली कार्यवाही केली असून न्‍यायालयीन प्रकरणे होऊन वसुली ठप्‍प आहे. शासन स्‍तरावर नित्‍य व्‍यवहाराकरिता निधी मिळण्‍याकरिता त्‍यांचे प्रयत्‍न सुरु आहेत. बँकेचे पुढे असे कथन आहे की, बँकेपुढे असणा-या अडचणीमुळे ठेवीदारांना त्‍यांच्‍या ठेवीच्‍या 20 टक्‍के रक्‍कम 3 महिन्‍याच्‍या अंतराने देण्‍याबाबत संचालक मंडळाच्‍या दि.5/2/2018 च्‍या सभेमध्‍ये धोरण निश्चित केले आहे आणि त्‍याप्रमाणे ठेवीदारांना रक्‍कम अदा करण्‍यात येईल. अंतिमत: त्‍यांनी हेतुत: सेवेमध्‍ये त्रुटी केलेली नाही आणि मयत शकुंतला यांची देय रक्‍कम अदा करण्‍यासाठी वर नमूद केल्‍याप्रमाणे हप्‍ते मंजूर करण्‍याची सवलत देणे न्‍यायाचे होईल. शेवटी तक्रार नामंजूर करण्‍याची विनंती केलेली आहे.

5. तक्रारकर्ते यांची तक्रार, बँकेचे लेखी उत्‍तर व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारीमध्‍ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ उपस्थित होणा-या वादमुद्दयांची कारण‍मीमांसा त्‍यांच्‍यापुढे दिलेल्‍या उत्‍तराकरिता खालीलप्रमाणे देण्‍यात येते. मुद्दे उत्‍तर 1. तक्रारकर्ते / मयत शकुंतला बँकेच्‍या ‘ग्राहक’ आहेत काय ? होय.

2. ? होय.

2. मयत शकुंतला / तक्रारकर्ते यांना बचत खात्‍यामधील रक्‍कम परत न करुन बँकेने त्रुटीयुक्‍त सेवा दिली आहे काय ? होय.

3. तक्रारकर्ते हे बचत खात्‍यातील रक्‍कम व्‍याजासह मिळण्‍यास पात्र आहेत काय ? होय.

4. काय आदेश ? शेवटी दिल्‍याप्रमाणे. कारणमिमांसा 6. मुद्दा क्र.

1 :- मयत शकुंतला यांच्‍या बचत खाते क्र.10305/12735 च्‍या खाते पुस्तिकेची छायाप्रत अभिलेखावर दाखल केलेली आहे. त्‍या खाते पुस्तिकेचे अवलोकन केले असता दि.5/10/2017 अखेर रु.96,719/- रक्‍कम बचत खात्‍यामध्‍ये शिल्‍लक जमा असल्‍याचे दिसून येते. बँकेचा बचाव आहे की, बचत खात्‍यामध्‍ये रु.96,719/- जमा असल्‍याचे सिध्‍द करणे आवश्‍यक आहे. विरुध्‍द पक्षांतर्फे लेखी युक्तिवाद व मौखिक युक्तिवाद करण्‍यात आलेला नाही. तक्रारकर्ता यांनी लेखी युक्तिवाद दाखल केला आणि त्‍यांचा मौखिक युक्तिवाद ऐकण्‍यात आला. बँकेच्‍या प्रतिवादाची दखल घेतली असता मयत शकुंतला यांना बँकेने पासबूक निर्गमीत केलेले नाही, असे बँकेचे स्‍पष्‍ट कथन नाही. असेही दिसून येते की, अभिलेखावर दाखल मयत शकुंतला यांच्‍या बचत खाते पुस्तिकेचे खंडन करण्‍यासाठी बँकेने स्‍वतंत्र व योग्‍य पुरावा दाखल केलेला नाही. त्‍यामुळे मयत शकुंतला यांचे बँकेमध्‍ये बचत खाते क्र.10305/12735 आहे, या निष्‍कर्षाप्रत आम्‍ही येत आहोत.

7. बँकेचा असाही बचाव असा आहे की, मयत शकुंतला ह्या तेर वि.का.से.सह. सो.लि. च्‍या सभासद आहेत आणि त्‍या बँकेच्‍या ग्राहक असल्‍याचे त्‍यांना अमान्‍य आहे. वास्‍तविक पाहता मयत शकुंतला ह्या तेर वि.का.से.सह. सो.लि. च्‍या सभासद आहेत, असे दर्शविणारी उचित कागदपत्रे अभिलेखावर दाखल नाहीत. आमच्‍या मते, मयत शकुंतला ह्या तेर वि.का.से.सह.सो.लि. च्‍या सभासद असल्‍याचे काही क्षणाकरिता ग्राह्य धरले तरी प्रस्‍तुत प्रकरणामधील बँक व वि.का.से.सह.सो.लि. ह्या दोन भिन्‍न संस्‍था आहेत आणि त्‍या संस्‍थांचे स्‍वत:चे वेगवेगळे अस्तित्‍व असल्‍यामुळे त्‍या स्‍वतंत्र विधिमान्‍य व्‍यक्‍ती‍रेखा आहेत. तसेच तेर वि.का.से.सह.सो.लि. संस्‍था प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये पक्षकार नाही आणि त्‍या संस्‍थेशी मयत शकुंतला यांच्‍या बचत खात्‍याचा दुरान्‍वये संबंध दिसून येत नाही.

8. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मध्‍ये नमूद ‘सेवा’ संज्ञेमध्‍ये ‘बँकींग’ विषय अंतर्भूत आहे. मयत शकुंतला ह्या बँकेच्‍या बचत खातेदार होत्‍या. र होत्‍या. सुनावणीदरम्‍यान त्‍यांचा मृत्‍यू झालेला आहे आणि त्‍यांचेकरिता तक्रारकर्ते क्र.

1 ते 5 हे वारस नात्‍याने तक्रारीमध्‍ये समाविष्‍ठ झाले. तक्रारकर्ते क्र.1 ते 5 यांनी तक्रारीमध्‍ये समाविष्‍ठ करण्‍यासाठी अर्ज, शपथपत्र व तेर ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी दिलेले वारस प्रमाणपत्र दाखल केले आहे. बँकेने त्‍याकरिता आक्षेप घेतलेला नाही किंवा खंडन केलेले नाही. अशा परिस्थितीत मयत शकुंतला यांच्‍या मृत्‍यूपश्‍चात तक्रारकर्ते क्र.1 ते 5 हे वारस नात्‍याने बचत खात्‍यातील रक्‍कम मिळण्‍याकरिता ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 2 (1) (डी) (2) अन्‍वये ‘ग्राहक’ संज्ञेत येतात आणि आम्‍ही मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी देत आहोत.

9. मुद्दा क्र.2 व 3 :- बॅंकेच्‍या कथनाप्रमाणे मयत शकुंतला यांनी पासबुक व पे-स्‍लीप बँकेच्‍या संबंधीत लिपीक, कॅशीअर व शाखाधिकारी यांच्‍याकडे कदापि दिलेली नाही आणि ते दुस-या त्रयस्‍थ व्‍यक्‍तीकडे पे-स्‍लीप देऊन रकमेची मागणी करीत असल्‍यामुळे बँकेने स्‍वीकारली नाही. आमच्‍या मते ज्‍यावेळी मयत शकुंतला ह्या बचत खात्‍यातील रक्‍कम मिळविण्‍याकरिता जिल्‍हा मंचापुढे तक्रार दाखल करतात, त्‍यावेळी त्‍या स्‍वत: बँकेमध्‍ये न जाता त्रयस्‍थ व्‍यक्‍तीद्वारे रकमेची मागणी करतील, हे सहजपणे मान्‍य करता येत नाही. उलटपक्षी मयत शकुंतला यांना देय असणारी रक्‍कम परत करण्‍याकरिता हप्‍ते मंजूर करण्‍याची बँकेतर्फे केलेली विनंती पाहता बँकेने मयत शकुंतला यांना बचत खात्‍यातील रक्‍कम अदा केलेली नाही, असे स्‍पष्‍ट अनुमान काढणे न्‍यायोचित आहे.

10. बॅंकेने लेखी निवेदनाद्वारे विविध अडचणींचा ऊहापोह केलेला आहे. तत्‍कालीन चेअरमन व अधिका-यांचा संगनमताने रु.30 कोटींचा झालेला भ्रष्‍टाचार, साखर कारखान्‍यांकडे असणारे रु.250 कोटीचे थकीत कर्ज व न्‍यायालयीन प्रकरणांमुळे वसुली ठप्‍प होणे इ. कारणे बँकेने नमूद केली आहेत. तसेच एन.पी.ए. वाढल्‍यामुळे रिझर्व बँक ऑफ इंडियाने बँकींग रेग्‍युलेशन अॅक्‍टचे कलम 22 व 35 प्रमाणे वैधानिक आदेश जारी करुन नवीन ठेव स्‍वीकारण्‍यास प्रतिबंध घातला आणि रु.250 कोटीच्‍या ठेव रकमा ठेवीदारांनी काढून घेतल्‍यामुळे बँकींग व्‍यवहारासाठी निधी उपलब्‍ध न राहून ठेवीदारांच्‍या ठेव रकमा परत करण्‍यामध्‍ये अडचणी निर्माण झाल्‍या, असेही त्‍यांचे निवेदन आहे.

11. न आहे.

11. येथे आम्‍ही हे स्‍पष्‍ट करु इच्छितो की, बँकेच्‍या अधोगतीस जी कारणे नमूद करण्‍यात आलेली आहेत, त्‍या कारणांचा मयत शकुंतला यांना देय असणा-या रकमेशी योग्‍य व उचित संबंध दिसून येत नाही. ज्‍यावेळी मयत शकुंतला यांच्‍याकडून बँकेने बचत खात्‍यामध्‍ये विनाशर्त रक्‍कम स्‍वीकारलेली आहे, त्‍यावेळी मयत शकुंतला यांच्‍या मागणीनंतर रक्‍कम परत करण्‍याचे कायदेशीर बंधन बँकेवर येते. एखाद्या वित्‍तीय संस्‍थेचा खातेदार हा त्‍याच्‍या बचत खात्‍यातील रकमेची मागणी करीत असल्‍यास त्‍याच्‍या मागणीप्रमाणे रक्‍कम परत करणे, त्‍या वित्‍तीय संस्‍थेची करारात्‍मक जबाबदारी व कर्तव्‍य आहे. प्रस्‍तुत प्रकरणाच्‍या वस्‍तुस्थितीनुसार बँकेने मयत शकुंतला किंवा मयत शकुंतला यांच्‍या मृत्‍यूपश्‍चात तक्रारकर्ते यांना वादकथित बचत खात्‍यातील रक्‍कम परत न करुन सेवेमध्‍ये त्रुटी निर्माण केलेली आहे. मयत शकुंतला यांच्‍या बचत खात्‍यातील रक्‍कम त्‍यांच्‍या वारसांना परत करण्‍याच्‍या जबाबदारीतून बँकेस मुक्‍त होता येणार नाही आणि तक्रारकर्ते हे मयत शकुंतला यांच्‍या बचत खात्‍यातील जमा रक्‍कम मिळण्‍याकरिता हक्‍कपात्र आहेत, या निष्‍कर्षाप्रत आम्‍ही येत आहोत.

12. मयत शकुंतला यांच्‍या बचत खात्‍यामध्‍ये जमा असणारी रक्‍कम व्‍याजासह मिळावी, अशी विनंती तक्रारीमध्‍ये केलेली आहे. बचत खात्‍याचा सर्वसाधारण व्‍याज दर द.सा.द.शे.

3 ते 4 टक्‍के दिसून येतो. बँकेने मयत शकुंतला यांना योग्‍यवेळी रक्‍कम अदा न केल्‍यामुळे 1 टक्‍का अतिरिक्‍त व्‍याज दर दंडात्‍मक स्‍वरुपात वाढ करुन द.सा.द.शे.

5 टक्‍के व्‍याज दराने बचत खात्‍यातील रक्‍कम बँकेने द्यावी, या निष्‍कर्षाप्रत जिल्‍हा मंच येत आहे. मयत शकुंतला यांनी दि.6/10/2017 रोजी बँकेकडे बचत खात्‍यातील रकमेची मागणी केल्‍याचे नमूद केले असल्‍यामुळे बचत खात्‍यातील रकमेवर दि.6/10/2017 पासून व्‍याज मिळण्‍यास तक्रारकर्ते पात्र आहेत. मानसिक व शारीरिक त्रासाकरिता; तसेच तक्रार खर्चाकरिता केलेल्‍या मागणीचा विचार केला असता मयत शकुंतला यांचा कोणताही दोष नसताना बँकेने रक्‍कम परत केलेली नाही. मयत शकुंतला यांच्‍या कथनानुसार मुलीच्‍या शिक्षणाकरिता त्‍यांना बचत खात्‍यातील रकमेची आवश्‍यकता होती. यकता होती. परंतु मयत शकुतंला यांचा मृत्‍यू झाल्‍यामुळे त्‍यांना जो मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला त्‍याकरिता त्‍या स्‍वत: भरपाई मिळण्‍याकरिता पात्र होत्‍या. त्‍यामुळे मयत शकुतंला यांना सहन कराव्‍या लागलेल्‍या त्रासाकरिता तक्रारकर्ते यांना नुकसान भरपाई मंजूर करणे न्‍यायोचित होणार नाही. प्रस्‍तुत तक्रार दाखल करण्‍यासाठी मयत शकुंतला यांना खर्च करावा लागला आहे. त्‍या अनुषंगाने तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- रक्‍कम मंजूर करणे योग्‍य व उचित वाटते. याद्वारे मुद्दा क्र.2 व 3 चे उत्‍तर होकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येतो. आदेश (1) तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येते. (2) विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 बँकेने मयत शकुंतला यांचे बचत खाते क्र.10305/12735 मध्‍ये एकूण जमा असणारी रक्‍कम तक्रारकर्ते यांना अदा करावी. तसेच प्रस्‍तुत रकमेवर दि.6/10/2017 पासून ते सदर रक्‍कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे.

5 टक्‍के दराने व्‍याज द्यावे. (3) विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 बँकेने तक्रारकर्ते यांना तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत. (4) उपरोक्‍त आदेशाची अंमलबजावणी विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 बँकेने वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या प्रस्‍तुत आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत करावी. (श्री. किशोर द. वडणे) (श्री. मुकुंद भ. सस्‍ते) अध्‍यक्ष (श्री. शशांक श. क्षीरसागर) सदस्‍य सदस्‍य जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्‍मानाबाद. -oo- (संविक/ स्‍व/25220) [HON'BLE MR. किशोर द. वडणे] PRESIDENT [HON'BLE MR. मुकुंद भ. सस्‍ते] MEMBER [HON'BLE MR. शशांक श. क्षीरसागर] MEMBER